ज्या देशात विषमता आहे,तो देश शोषणमुक्त राहूच शकत नाही. शोषण याचा पिळवणूक,श्रम न करता पैसे संपती कमावणे,स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी ,सुखी होण्यासाठी,चैन आरामसाठी इतरांस कमी मोबदल्यात राबवून घेणे,लोकांना मानसिक गुलाम बनवून त्यांचा आपल्या स्वार्थासाठी फायदा घेणे, इतरांवर अन्याय करणे,दादागिरी करणे,त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेणे, इतरांवर अत्याचार जुलूम जबरदस्ती करणे,वेठीस धरणे,भ्रष्टाचार करणे,काळाबाजार,साठेबाजी,कृत्रिम टंचाई निर्माण करून भाव वाढविणे,अफाट नफा मिळविणे,इतरांना कष्टाचे दाम न देणे,शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाधारीत त्यांच्या उत्पादित मालास भाव न देणे.कारखान्यातील कामगारांना उत्पादित वस्तूपासून.मिळालेल्या नफ्यात वाटा न देणे,फसवणूक धोका देऊन इतरांची संपती हडपणे,स्त्रीयांना पुरुषांनी हुकुमशाहीचीची वर्तणूक देणे,तिला तिच्यातील गुण क्षमता कौशल्य वाढीस स्वातंत्र्य न देणे,वरच्या जातीने खालच्या जाती सोबत अमानुष वर्तणूक करणे,अस्पृश्यता,भेदभाव करणे,देव धर्माच्या नावाखाली भक्ताची आर्थिक फसवणूक पिळवणूक करणे,त्यांना मानसिक गुलाम बनवणे.माणसाच्या गरिबीचा,मजबुरीचा गैरफायदा घेणे,वर्ग जात धर्म पाहून माणुसकीची वागणूक न देता मानविहक्काची पायमल्ली करणे. अशा कितीतरी आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक गोष्टी उदाहरणे अनिष्ट रूढी परंपरा आहेत,की ,ज्यातून माणूस माणसाचे.शोषण कसे करतो आहे हे स्पष्ट होते.स्पष्ट दिसते.याचे कारण.विषमता हे आहे.माणसाच्या वर्तनात बोलण्यात राहण्यात खाण्यात पिण्यात केशभूषा वेशभूषा भाषेतील टोन त्याची आर्थिक सामाजिक स्थान याचेतून समता आणि विषमता ही दिसून येते.हुकुमशाही लोकशाही दिसून येते.
ज्या देशात मोठमोठे जमीनदार भांडवलदार कारखानदार कंपनीवाले आहेत,त्या देशात आर्थिक विषमता भयानक असते.अर्थात गरीबी आणि श्रीमंती यातील दरी ची रुंदी किती कमी जास्त आहे ,यावरून तेथील वर्गीय व्यवस्था दिसून येते,जिथे गरीबी तिथेच श्रीमंती असते.कारण तेथे गरिबांचे श्रमाचे वेळेचे बुद्धीचे शरीराचे शोषण असते.तसेच जिथे जातीव्यवस्था असते तिथे सामाजिक शोषण असते आणि जिथे देव धर्माचा पगडा असतो,तिथे मानसिक शोषण असते.हे सूत्र आहे.जिथे वंशवाद वंशाभिमान आहे,तिथे जातीव्यवस्था आहे,तिथे सामाजिक शोषण आहे.आणि जिथे अज्ञान आहे तिथे देव आणि धर्म आहे,आणि त्याद्वारे माणसाचे आर्थिक मानसिक शोषण आहे.
आणि वरील चित्र परिस्थिती अवस्था ज्या देशात आहे,तिथे विषमता आहे.विषमता अधिष्ठित समाजरचना ( वर्गीय जातीय ) आहे.धार्मिक क्षेत्रात पण आर्थिक विषमता आहे.जसे की,मठाधिपती म्हणजे जमीनदारच आहेत.जमीनदार आणि मठाधिपती किंवा देवस्थानचे ट्रस्टचे सदस्य आणि पुजारी हे सारेच श्रीमंत वर्गात मोडतात.मोठमोठे कीर्तनकार ,कथाकार हजारो लाखो पैसे घेऊन श्रीमंत झालेत.हे श्रीमंत आणि त्यांचा मोठ्या संख्येने असलेला मध्यम वर्गीय आणि गरीब भक्त गण यांचे हे धर्ममार्तंड शोषण करीत असतात.देव धर्माचे मायाजाल जादू करून भक्तांचे शारीरिक मानसिक आर्थिक शोषण करतात.यांच्या गळाला उच्चशिक्षित पण लागलेत.त्यांचे पण हे जादूगार मांत्रिक भविष्यकार देव धर्म रूढी परंपरा या द्वारे शोषण करीत असतात.
हे सारे असे का घडते ? याचे कारण येथील विषमतेची व्यवस्था.अशा व्यवस्थेत विषमतेची च परिस्थिती अवस्था असणार.आणि अशा वातावरणात सारी जनता मानसिक गुलामगिरीत वावरत असते.आपले शोषण त्यांना दिसत नाही,आणि दिसले तरी ते काहीच करू शकत नाहीत.कारण विषमतावादी व्यवस्थेचे कायदे कानून,रूढी ,परंपरा यांच्या विळख्यात ही जनता असते.
अर्थात ही परिस्थिती बदलायची तर मुळावरच घाव घालावा लागेल.म्हणजे ही विषमतावादी व्यवस्था ,रचनाच उध्वस्त करावी लागेल,आणि समतावादी व्यवस्था म्हणजे ज्या व्यवस्थेत आर्थिक वर्ग,सामाजिक जाती आणि धर्माद्वारे शोषण नसेल,अशी व्यवस्था.पण यासाठी या विचारांच्या लोकांनी तन मन धन लावावे लागते.अनेक त्यागी कार्यकर्ते जीवाची पर्वा न करता कामी लागले पाहिजे. करो या मरो, असा दृढनिश्चय केला पाहिजे.
शोषणमुक्ती चा लढा दिला पाहिजे.शोषणविरोधी रणशिंग फुंकले पाहिजे.जसे एका कवितेत केशवसुत म्हणाले ” जुने जाऊ द्या,मरणालागुनी. जाळून किंवा पुरून टाका,सावध ऐका पुढल्या हाका.एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकेंन मी ती स्व प्रानाणे.”
” भारत शोषणमुक्त केल्याशिवाय मी गप्प मूग गिळून बसणार नाही ” अशी मनोमनी संकल्प करण्याची ही वेळ आहे.
राजकीय स्वातंत्र्य मिळाले,अजूनही राजकीय न्याय मिळाला नाही.तो आपण मिळवून आणि मिळून घेऊ या.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 13 ऑक्टोबर 2025. फोन : 9420912209.


