Home Vidarbha वाघाचा बंदोबस्त न केल्यामुळे वनविभागाच्या विरोधात 14 ऑक्टोंबरला आंबोली चौरस्ता येथे रास्ता...

वाघाचा बंदोबस्त न केल्यामुळे वनविभागाच्या विरोधात 14 ऑक्टोंबरला आंबोली चौरस्ता येथे रास्ता रोको आंदोलन… — शेतकरी शेतमजूरांना घेऊन शुभम मंडपे करणार आंदोलन…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

       वन विभाग वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी अयशस्वी ठरल्याने वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष शुभम मंडपे हे शेतकरी, पदाधिकारी,यांच्या सोबत आंबोली चौरस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.

          दि.१८/०९/२०२५ ला मौजा लावरी येथील विद्या कैलास मसराम या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते.त्यामुळे आंबोली गडपिपरी,पुयारदंड,वाकर्ला,जवराबोडी,लावारी,चीचाळा शास्त्री परिसरात शेतकरी व शेतकरी मजुरांमध्ये खूप भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

       त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व आंबोली ग्रा.प सदस्य शुभम मंडपे यांनी दहा दिवसा अगोदर दि २६/०९/२०२५ ला वनविभाग कार्यालय भिसी व वनविभाग कार्यालय चिमुर यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले होते व आठ दिवसाची अल्टीमेट दिली व रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देऊन आंबोली गडपिपरी,पुयारदंड,वाकर्ला,जवराबोडी,लावारी,चीचाळा शास्त्री परिसरातील फॉरेस्ट ला तारेचे कंपाऊंड करण्यात यावे व संपूर्ण वाघाचे तात्काळ स्थलांतरित करावे व वाघाचा बंदोबस्त करावा याची मागणी केली होती.

       मात्र,वन विभागाकडून याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाहीत्यामुळे वनपरीक्षेत्र अधिकारी देऊळकर सर वनविभाग कार्यालय चिमुर यांना निवेदन देऊन वाघाचा बंदोबस्त करून तात्काळ सर्व वाघाचे स्तलांतर दुसऱ्या जंगलात करावे व संपूर्ण जंगल परिसराला तारेचे कंपाउंड करावे या प्रमुख मागण्याकरिता दि 14/10/25 ला वनविभागाच्या विरोधात आंबोली चौरस्ता येथे आंबोली गडपिपरी, पुयारदंड, वाकर्ला, जवराबोडी, लावारी,चीचाळा शिरसपूर शिवरा परीसरातील शेतकरी व शेतमजू्रांच्या वतीने वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व आंबोली ग्रा.प. सदस्य शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

      दिनांक 18/09/025 ते आज 12/10/025पर्यंत वेगवेगळ्या अनेक घटना या परिसरामध्ये घडत आहेत.दिनांक २६/०९/२०२५ ला आंबोली चौरस्ता येथे गौरक्षणातील गाईला वाघाने ठार केले व दुपारी तीन वाजता मौजा चीचाळा (शास्त्री) येथील विनायक वासनिक यांच्या शेतावर निलगायला ठार केले,व तसेच ज्या ठिकाणी विद्या कैलास मसराम यांना वाघाने ठार केले त्याच ठिकाणी तिच्या दिराला व भावावर हल्ला करण्याचा प्रयत्न वाघाने केला.

         नंतर मौजा आंबोली ते शंकरपूर रस्त्यावर हजारे मॅडम यांना सकाळी आठ वाजता वाघाचे दर्शन झाले नंतर दिनांक ०२/०९/२०२५ दिघोरे सर यांना मौजा शंकरपूर आंबोली मार्गावर सकाळी नऊ वाजता वाघाचे दर्शन झाले.

       दिनांक ०३/१०/२०२५ मौजा जवराबोडी येथे शेत शिवारात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न वाघाने केला.

        दिनांक ०४/१०/२०२५ मौजा आंबोली, चक वागदरा रिठ येथे बावलाबाई चिंतामणी चौरे वय ६० यांच्यावर तीस फुटावरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला व दुपारी तीन वाजता मारोती शिवरकर यांच्या बैलबंडीच्या मागे वाघाने पळ काढला दिनांक ०५/१०/२०२५ ला साहिल शिवरकर मौजा आंबोली यांच्या शेतामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

       दिनांक ०६/१०/२०२५ ला रात्री ९:०० वा दुचाकी वर स्वार करणाऱ्या पती-पत्नीवर गडपिपरी जवळील स्मशानभूमीवर वाघाने हल्ला केला.त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. 

       येणाऱ्या ट्रकने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.दिनांक ०७/१०/२०२५ ला मौजा चिचाळा शास्त्री येथील दिलीप राऊत यांच्या शेतातील बैलावर वाघाने हल्ला करून ठार केले.व तसेच या नंतर वाघ्याच्या हल्ल्यात जीवित हानी झाल्यास याला पूर्णता जबाबदार वन विभाग राहील याची नोंद घ्यावी.

        जो पर्यंत वन विभाग कार्यालय चंद्रपूर चे अधिकारी व वन विभाग कार्यालय ब्रम्हपुरी व वन विभाग कार्यालय चिमूर चे प्रमुख अधिकारी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून लेखी स्वरुपात सर्व मागण्या मान्य करून देण्यात याव्या याची मागणी करण्यात आली.

       यावेळी निवेदन देतांना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष,आंबोली ग्रा.प. सदस्य शुभम मंडपे,मनोज राऊत, दीपक लाकडे,जीवन रंदये,संजय शिवरकर,मधुकर नागपुरे,मनोज सरदार,सुरेश गरमळे आदी उपस्तित होते.