Home Crime अमरावतीत अवैध गुटखा वाहतूक; पोलिसांची कारवाई, १५ लाखांचा मुददेमाल जप्त…

अमरावतीत अवैध गुटखा वाहतूक; पोलिसांची कारवाई, १५ लाखांचा मुददेमाल जप्त…

  अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

        दखल न्युज भारत 

अमरावती :- जिल्ह्यातील अवैध तंबाखू व गुटख्याविरोधी कारवाईत पोलिसांनी मोठा धडक यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढुर्णा ते वरूड रोडवरील पुसला टोल येथे नाकाबंदी करून काळ्या रंगाची महेन्द्रा स्कार्पीओ कार थांबवली आणि वाहन चालवणाऱ्या आरोपी मधु कुंजबिहारी पनपालीया (३८, रा. धामनगाव रेल्वे) याला ताब्यात घेतले.

           तपासात कारमधून शासन प्रतीबंधीत तंबाखूमिश्रीत सुगंधित पानमसाला/गुटखा व एकूण किंमत अंदाजे ४,३८,७५०/- रु., महेन्द्रा स्कार्पीओ कार (१०,००,०००/- रु.), दोन मोबाईल (५०,०००/- रु.) आणि नगदी ४,१५०/- रु. असा एकूण १५,४२,९००/- रु. मूल्याचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

            ही कारवाई पोलीस अधिक्षक श्री.विशाल आनंद व अपर पोलीस अधिक्षक श्री.पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थागुशा प्रमुख पोनि किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पोउपनि सागर हटवार, पोलीस अंमलदार रविंद्र बावणे, बळवंत दाभणे, गजेन्द्र ठाकरे, पंकज फाटे आणि चालक पोकों प्रशिक वानखडे यांचा समावेश होता.