Home Crime परतवाडा पोलीसांची कारवाई; २ चोरी झालेल्या मोटारसायकली ताब्यात…

परतवाडा पोलीसांची कारवाई; २ चोरी झालेल्या मोटारसायकली ताब्यात…

   अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

         दखल न्युज भारत

अमरावती :- परतवाडा – जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर लक्ष देत परतवाडा पोलीस स्टेशनने पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाने चोरी झालेल्या मोटारसायकली शोधून त्यांचा ताबा मिळवला आहे.

           फिर्यादी केशव शालीकराम काळे (वय ५५, रा. धामनगाव गढी, ता. अचलपुर) यांनी दिनांक २८/०९/२०२५ रोजी होंडा युनीकॉन (एम.एच. २७ सी.एस. ३०९९) मोटारसायकल चोरीसंदर्भात पोलीस स्टेशन परतवाडा येथे रिपोर्ट दिला होता.

          पोलीसांनी त्वरित चौकशी सुरू केली असता, गोपनीय माहितीच्या आधारे राजेश संजय उइके (वय ४२, रा. काटकुंभ चुर्नी, ता. चिखलदरा, जि. अमरावती) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले.

            सदर आरोपीच्या ताब्यातून चोरी झालेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या ज्यामध्ये १) होंडा युनीकॉन – एम.एच. २७ सी.एस. ३०९९ (किंमत ६०,००० रुपये)आणि २) स्प्लेंडर प्लस – एम.एच. २७ ए.एक्स. ६८५६ (किंमत अंदाजे ५०,००० रुपये) अशा एकूण २ मोटारसायकलींची किंमत अंदाजे १,१०,००० रुपये यांचा समावेश आहे. या मोटारसायकलींसंबंधी पोलीस स्टेशन परतवाडा येथे अनुक्रमे अपराध क्रमांक ६६४/२०२५, ६६७/२०२५ व ९६०/२०२३ नोंद आहेत.

          ही कारवाई मा.अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, सहायक पोलीस अधिक्षक डॉ.शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के, ठाणेदार परतवाडा आणि पोलीस अंमलदारांच्या टीमने पार पाडली.