पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- प्राथमिक आरोग्य केंद्र सावंगीच्या वतीने दि. १८ सप्टेंबर ला स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सावंगी येथे शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटक सावंगी ग्रामपंचायत च्या सरपंचा प्रभा ढोरे, अध्यक्ष डॉ.मसराम प्रमुख अतिथी उपसरपंच सुमंत मेश्राम, पोलीस पाटील सुधीर पेलणे, डॉ.धाडसे हृदयरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक गहाणे, डॉ. हरिश टेकाम यांचे उपस्थितीत या शिबिराच्या माध्यमातून सर्व नागरिकांचे रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, गरोदर मातांची प्रसूतीपूर्व तपासणी, मुलांचे लसीकरण, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, सिकलसेल तपासणी, विशेष तज्ञ डॉ. धाडसे यांच्या कडून हृदयरोग तपासणी, तसेच गडचिरोली येथून आलेले क्षयरोग टेक्निशियन संजली कांबळे व त्यांच्या चमुच्या मदतीने एक्स रे काढण्यात आले.
विशेष म्हणजे आयोजित शिबिरात ९० एक्सरे व एकूण २९६ लाभार्थ्यांनी इतर निदानाचा लाभ घेतला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चित्रलेखा मेश्राम, सोनाली दोनाडकर, प्रज्ञा बनपूरकर, राजेश परसे, मंजुषा नैताम, सर्व आरोग्य सेवक, सेविका, युवराज गोर्लावर, तसेच या शिबिरात अनिकेत विद्यालयाचे सर्व विदयार्थी, आशा सेविका, क्षेत्र कार्यकर्ते, तेजस करपे, नरेश इंदूरकर यांनी कार्यक्रम यशश्वितेसाठी परिश्रम घेतले.
सदर शिबिराचे सूत्रसंचालन आरोग्य निरीक्षक संजय सहारे व आभार डॉ. प्राची वालदे यांनी मानले.



