बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलास वाशी नंदाबाई सुतार यांच्या निधनाची माहिती मिळवताच तालुक्याचे युवा नेते श्रीराज भरणे यांनी आपली उपस्थिती लावली. व त्यांच्या दुःखामध्ये सामील होऊन सुतार परिवाराचे सांत्वन केले.
सांत्वन भेट प्रसंगी, कै.नंदाबाई सुतार यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
तालुक्याचे युवा नेते श्रीराज भरणे, हे सुतार परिवाराच्या सांत्वन भेटी प्रसंगी बोलत आसताना म्हणाले की, सुतार कुटुंब व परिवारा सहित पिंपरी बुद्रुक गावाने कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यावर दिलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल आमचे भरणे परिवार कधीच विसर पडू देणार नाही. सदैव तुमच्या व सर्वांच्या धार्मिक व सांस्कृतिक आणि सुख दुःखामध्ये सामील होणारच आसल्याचे यावेळी श्रीराज भरणे यांनी सांगितले.
यावेळी साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके, हरिभाऊ सुतार, चंद्रकांत सुतार, उत्तम बोडके, दत्तू अण्णा सुतार, ,ज्ञानदेव सुतार, महेश सुतार, विष्णू सुतार, बापूराव सुतार,आप्पासाहेब सुतार, संतोश सुतार, भारत सुतार, महादेव सुतार, किशोर सुतार, आर्जुन सुतार, वैभव पडळकर, प्रभाकर सुतार, नागनाथ काशीद, आधी सर्वच सुतार बांधव उपस्थित होते.



