Home Political माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या कार्यालयाला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.आशिष...

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या कार्यालयाला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.आशिष शेलार यांनी दिली भेट..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.आशिष शेलार हे रामटेक दौऱ्यावर असताना त्यांनी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या कार्यालयाला भेट दिली.

        कार्यालयात मंत्रीमहोदयाचे आगमन होताच माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

        याप्रसंगी वित्त व कामगार कल्याण राज्यमंत्री ना.आशिष जयस्वालभाजपा जिल्हाध्यक्ष श्री.आनंदराव राऊत,जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह(गज्जू)यादव,जिल्हा उपाध्यक्ष संजयजी मुलमुले,माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे,भाजपा मंडळ अध्यक्ष योगेश मात्रे,भाजप शहर अध्यक्ष रजत गजभिये,आलोक मानकर,उमेश पटले,चंदू बैस सह भाजपा परिवारातील सदस्य उपस्थित होते.