Home Maharashtra अकोला येथील भोई समाजाच्या मुलीवरील बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या :- संघटनेची...

अकोला येथील भोई समाजाच्या मुलीवरील बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या :- संघटनेची मागणी…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

        पारशिवनी तालुक्यातील मौजा अकोला येथील भोई समाजाच्या १३ वर्षीय बालिकेवर एका पिसाळलेल्या नराधमांनी बलात्कार केला. त्या आरोपीस फाशीसह विविध मागणीचे निवेदन सोमवारी १५ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र यांना ढिवर समाज संघटनाच्या वतीने पारशिवनीच्या तहसीलदार मार्फत देण्यात आले.

         महाराष्ट्र राज्यातंर्गत नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात मौजा अकोला येथे ०६ /०९/२०२५ रोजी घरचे सर्व मंडळी गणपती विसर्जनसाठी गेले होते.

               पूर्वीच्या विविध गुन्ह्यातील २८ वर्षीय आरोपी तौहिदखान समीरखान बैद रा.खैर मोहम्मद प्लॉट,डाबकी रोड अकोला यांनी गरीब भोई समाजाची १३ वर्षीय बालिका घरी एकटी असल्याचे पाहून घरात शिरला व चाकूचा धाक दाखवून जबरन लैंगिक अत्याचार बालिकेवर केला.

          आरोपी पोलीस अटक टाळण्यासाठी पसार झाला.घटनेच्या विरोधात भोई समाजाच्या विविध संघटना पेटून उठल्या.त्यामुळे उशिरा आरोपीस पोलिसांनी अटक केली. 

          सदर व्यक्ती हा पूर्वीच्या बलात्कार यासह विविध गुन्ह्यातील आरोपी आहे.तो पुन्हा पुन्हा असे कृत्य करण्याची शक्यता अधिक आहे. 

त्यामुळे मागणी आहे की…

 १) आरोपीस न्यायालयातून जामीन मिळू नये…

 २) आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी…‌

 ३) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित कुटुंबाला रुपये २५ लक्ष रुपये मदत मिळावी…

  ४) पीडितास व कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे. 

        वरील प्रमाणे मागण्या असून पीडिताला न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदार पारशिवनी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताना महाराष्ट्र ढिवर समाज कल्याण संघ नागपूर,महाराष्ट्राचे अध्यक्ष ईश्वर खंगार,तसेच ढिवर समाज संघटना कन्हानचे अध्यक्ष सुतेश मारबते,बाळकृष्ण खंडाते,मनोज बावणे,प्रभाकर केळवदे,सागर बावणे,कैलास शिलार,सुरज राऊत,नंदकिशोर मस्के,दिलीप खंडाते,अंकुश कामठे,अशोक टोहने,मेहंदीच्या सरपंच वर्षा खंडाते,वासुदेव खंडाते,पवन शिवरकर,इंद्रपाल डायरे यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.