Home देशविदेश कुरतडणारे किडे :- अनंत दा.राऊत…

कुरतडणारे किडे :- अनंत दा.राऊत…

कल्पितात तरमणारे लोक

असतात फारच बालबुद्धी 

त्यांना नसतात गाठता येत 

कधीच कुठल्या सिद्धी

व्याधी असते मनाची त्यांना 

वास्तव नाहीत जाणत

निर्मिती शून्य रंजनभावात

राहतात स्वतःला ताणत 

मानत असतात नुसतच ते

जाणत काहीच नसतात 

प्रगतीच्या अंकुरांना 

कुरतडणारे हे किडे असतात

असल्या किड्यांचीच संख्या आज

देशात वाढलीये भरमसाठ 

बुद्धिवाद विज्ञानवादाकडे 

फिरवलीय साऱ्यांनी पाठ