Home Political भाजप हा जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेला पक्ष :- प्रदीप कंद… —...

भाजप हा जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेला पक्ष :- प्रदीप कंद… — भाजप आळंदी ग्रामीण मंडल नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण सोहळा संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या समाजातील आणि परिसरातील जनतेचे प्रश्न ओळखून ते सोडवण्यासाठी सातत्याने काम करणे हीच खरी कार्यकर्त्याची ओळख आहे,भाजप हा नेहमीच जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. असे प्रतिपादन पुणे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले.

      भाजप आळंदी ग्रामीण मंडळ नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण सोहळा व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.राम गावडे, मा.तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, मंडल अध्यक्ष अमोल वीरकर, संपतराव बवले, पांडुरंग ठाकूर, मा.शहराध्यक्ष किरण येळवंडे, बापूसाहेब थिटे, रवींद्र ठाकूर, राहूल घोलप, किरण कदम, संगीता फपाळ, मयुर पेटकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

      यावेळी प्रदीप कंद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. कंद म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकीपुरतेच नव्हे तर दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घ्यावा. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्न सोडवूनच कार्यकर्त्यांवरचा जनतेचा विश्वास अधिक बळकट होतो.

      भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.राम गावडे यांनी सांगितले की जनतेच्या मनातील विश्वास जिंकण्यासाठी सतत संवाद साधणे व त्यांच्या अडचणींचे निवारण करणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवून सामान्य माणसाला त्याचा लाभ मिळवून द्यावा. हेच खरे समाजसेवेचे काम आहे.