Home Social ग्रामपंचायत येरकडच्या ग्रामसभेत विविध विषयावर ठराव पारित…

ग्रामपंचायत येरकडच्या ग्रामसभेत विविध विषयावर ठराव पारित…

भाविकदास करमनकर

 तालुका प्रतिनिधी धानोरा

         ग्रामपंचायत येरकडची ग्रामसभा आज महादेव मंदिराच्या जवळील सभागृहात पार पडली सभेचे अध्यक्ष वासुदेव उसेंडी, सरपंच ग्रामपंचायत येरकड हे होते तर सभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.ग्रामसभेचे कामकाज जयंत मेश्राम ग्रामपंचायत अधिकारी यांनी पार पाडले.

           सभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 26 – 27 चा आराखडा तयार करण्यात आला. तंटामुक्त गाव समिती चे पुनर्गठन,तसेच दिनांक 12/8/2025 च्या पत्रानुसार मोकाट जनावरचे व्यवस्थापन, पीएम सूर्य घर योजना बाबत लोकांना जाणीव जागृती करून जास्तीत जास्त घरावर सौर ऊर्जेचे सयंत्र कसे बसवल्या जातील यावर ग्रामस्थांनी चर्चा केली.

         PIA 22/ 23 चा शाश्वत विकासाचा 9थीम वरून ग्रामपंचायतीचा रिपोर्ट कार्ड तयार झाला आहे तो रिपोर्ट कार्ड ग्रामसभेमध्ये आज सादर करण्यात आला.

         तसेच गावातील स्वच्छता स्वच्छता विषयक बाबीवर चर्चा करण्यात आली सार्वजनिक शौचालयाच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. विविध विकासकामे सिमेंट रस्ते, नाली बांधकाम मंजूर करणे सोबतच घरकुलचा आढावा सुद्धा ग्रामसभेत घेण्यात आला.

           अपूर्ण घरकुले त्वरित कसे पूर्ण करता येईल यावर सुद्धा चर्चा झाली व नव्याने मंजूर झालेले घरकुल त्वरित सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या चर्चेत सहभागी होऊन ग्रामपंचायतला सहकार्य केले.

           लालाजी जाग धुर्वे, स्वप्निल शिंपी,पुष्पा नरोटे,ममता आचला, विलास कोरेटी,गणेश उसेंडी यांचे सर्वांचे आभार श्री जयंत मेश्राम यांनी आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपविण्यात आली.