Home Maharashtra मोठया लाकडाला लहान लाकडाचा आधार,अपघाताचा धोका… 

मोठया लाकडाला लहान लाकडाचा आधार,अपघाताचा धोका… 

भाविकदास करमनकर

  तालुका प्रतिनिधी धानोरा

        धानोरा तालुक्यातील गोडलवाई ते मिचगाव झाडा रस्त्यावर जोरात आलेल्या वाऱ्यामुळे सागाचे झाड विद्युत खांबावर पडले त्यामुळे विद्युत तारा तुटल्या परिसरातील दोन दिवस लाईन बंद होती.

         लाईन दुरुस्त करत असताना विद्युत तारावर पडलेले झाड तोडावे लागले त्या झाडाला खाली न पडता त्या झाडाला दुसऱ्या एका काठीचा आधार देऊन तसेच रस्त्यावर उभे करून ठेवले.त्यामुळे येणारा जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पडण्याची दाट शक्यता असल्याने अपघाताचा धोका बळावला आहे.

         गोडलवाई परिसरामध्ये असणारे वनविभागांनी त्या झाडाला तोडून न टाकता तसेच ठेवलेले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका आणखीनच बडवला असून रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पडल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे अशा वेळेस एखाद्या वाटसरूचा नागरिकाचा जीव जाण्याचा धोका आहे.

          वनविभाग एखाद्या व्यक्तीचा किंवा वाटसरूचा नागरिकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न नागरिकला पडला आहे? 

         त्या झाडाला टेकू दिले दिला असल्यामुळे ते झाड तोडून होणाऱ्या अपघातापासून पासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.