Home क्रीडा घुगुसमध्ये ‘लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट’ तर्फे मॅरेथॉनचे आयोजन…

घुगुसमध्ये ‘लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट’ तर्फे मॅरेथॉनचे आयोजन…

 प्रेम गावंडे

 उपसंपादक

दखल न्युज भारत

          घुगुस, १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्यदिनानिमित्त लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व प्रियदर्शी कन्या विद्यालय, घुगुस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. “I Run, They Learn” या प्रभावी घोषवाक्याने सजलेला हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये जवळपास २०० विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक नागरिक, पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

            या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या सौ. अनु खानझोडे, LOLT समन्वयक मुकेश भोयर, ज्येष्ठ शिक्षक खामणकर, मोरे, विखार यांच्यासोबतच LOLT चे सह. समन्वयक कु . साक्षी काळे, रश्मी होले, प्रज्ञा पवार आदी उपस्थित होते. मान्यवरांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगत ट्रस्टच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट नेहमीच अग्रेसर असते. 

        मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने विशेष सहकार्य केले. त्यामुळे शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात मॅरेथॉन पार पडली.

                  विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला सामाजिक भव्यता प्राप्त झाली. असेच आयोजन पडोली आणि पांढरकवडा येथे देखील करण्यात आले. शिक्षणासाठी धावलेली ही मॅरेथॉन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाशाचा किरण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.