Home Maharashtra त्या टाॅवर बांधकामाच्या खड्ड्यात पडले म्हशीचे बछडे!… — टाॅवर बांधकाम करण्यासाठी...

त्या टाॅवर बांधकामाच्या खड्ड्यात पडले म्हशीचे बछडे!… — टाॅवर बांधकाम करण्यासाठी जवळच्या नागरिकांसह दवाखान्याच्या डाॅक्टरांची,शाळा मुख्याध्यापकांची लेखी संमती आवश्यक….

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक

      मौजा जांभुळघाट येथे एअरटेल कंपनी चे टाॅवर उभे करण्यासाठी खड्डे खोदलेले असून बऱ्याच दिवसांपासून टावरचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही.खोदलेल्या खड्ड्यांमुळे लहान मुलांची किंवा लहान पाळीव प्राण्यांची जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.

     काल मिलिंद गोंगले यांच्या म्हशीचे दोन बछडे सदर खोदलेल्या खड्यात पडले होते.नागरिक हजर असल्यामुळे सुदैवाने ते बछडे वाचले.

        एअरटेल मोबाईल कंपनी चे टाॅवर उभे करण्यासाठी नियमानुसार परवानगी मिळाली नसेल तर का म्हणून खड्डे खोदून ठवले हा प्रश्न आहे.

             याचबरोबर मोबाईल टॉवर मुळे नागरिकांना बहिरेपणा व बधीरपणा येत असल्याने जवळच्या नागरिकांची टाॅवर उभे करण्यासाठी नियमानुसार परवानगी पाहिजे आहे..

        तद्वतच जवळपास शाळा व दवाखाना असल्यास डॉक्टर व मुख्याध्यापकांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.मोबाईल टाॅवर हे पर्यावरणाचे सुध्दा नुकसान सातत्याने करतो आहे.

        यामुळे खड्डे खोदून ठेवलेल्या कंत्राटदारावर उचित कार्यवाही होणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत..