प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
हेल्पिंग हॅन्ड टीम वन समाजातील जात आणि धर्म याचा कोणताही विचार न करता ज्या अती गरजू व्यक्ती कॅन्सर, किडनी, ब्रेन हॅमरेज, ब्रेन ट्यूमर आणि पॅरॅलिसिस या आजाराने ग्रस्त आहेत त्यांना आजारावरील उपचारासाठी आणि सोबतच अठरा वर्षाखालील मुले ज्यांचे आई-वडील दोघेही मरण पावले आहेत आणि त्यांचा सांभाळ काका काकू, मामा मामी, आजी आजोबा करत आहेत आणि ते पण अल्प उत्पन्न गटातील आहेत.
अशा कुटुंबांना शिक्षणासाठी मदत करत असते. त्याचाच एक भाग म्हणून वृद्धाश्रमात असलेले जे वृद्ध आहेत त्यांचे मानसिक स्वास्थ्य समजून घेणे, त्यांना भावनिक आधार देणे, आणि सोबतच त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यानुसार त्या अनुषंगाने त्याची प्रतिपूर्ती करणे या हेतूने एक अभ्यास दौरा सुभाष शिंदे संचालित देवाडा येथील डेबू सावली वृद्धाश्रम इथे आयोजित करण्यात आला.
यावेळी तिथे उपस्थित जवळपास 30 वयोवृद्धांची आस्था पूर्वक माहिती जाणून घेण्यात आली. सुभाष शिंदे यांनी डेबू सावली वृद्धाश्रम स्थापन करण्यामागची भूमिका समजावून सांगितली. विशेष म्हणजे तिथले सगळे वयोवृद्ध खूप खुश आणि आनंदी वाटले. त्यांनी आम्ही जरी वयाने म्हातारे झालो तरी मनाने मात्र तरुण आहोत असं आवर्जून सांगितलं आणि आम्हाला पण एक आश्चर्य मिश्रीत आनंदाचा धक्का बसला.
जेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही इथे खुश आहोत आनंदी आहोत आणि आमच्या सर्व गरजा इथे पूर्ण होत आहेत. तुमच्यासारखे लोक येतात आणि वाढदिवस आणि इतर कार्यक्रम साजरे करून आम्हाला आपले आनंदात सहभागी करून घेतात ही खूप समाधानाची बाब आहे. एक प्रकारे हा आमचा वृद्धाश्रम नसून आनंदाश्रम आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
काही वयोवृद्धांनी गीत पण सादर केली. अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने हेल्पिंग हँड टीम वन सदस्य रामदास ठोंबरे यांनी वृद्धाश्रमाला आर्थिक मदत केली. सोबतच समस्त मंडळींना फळ वाटप सुद्धा करण्यात आले. याप्रसंगी माझ्यासोबत एन.ए. रायपुरे, सखाराम वनकर, रोहिदास पुणेकर आणि महाराष्ट्रातील सुविख्यात गायिका निशा धोंगडे उपस्थिती होती.



