शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर:-चिमूर तालुकांर्गत मौजा साठगांव येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने प्रिती दिडमूठे यांच्या पूढाकाराने राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेंत गावातील लहान बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग नोदवला.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने बालकृष्णांनी दहीहंडी फोडून कृष्णजन्मोत्सव साजरा केलाय.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत साठगांवचे उपसरपंच्या प्रिती दिडमूठे,मिरा मालोदे,ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमांच्या शेवटी बालगोपालांना बिस्किट पूडे व खाऊचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे गावातील बालकृष्णांचा उत्साह दुपटीने वाढला.



