बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
कारगिल शहीद वजीर रस्ते यांच्या 26 व्या शहीद दिना निमित्त माजी सैनिक व इंदापुर तालुक्यातील अनेक पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत शहीद वजीर रस्ते यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ओझरे तालुका इंदापूर येथील वीर सुपुत्र व कारगिल शहीद वजीर रास्ते यांचा सालाबाद प्रमाणे 26 व्या शहीद दिना निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
शहीद वजीर रस्ते यांच्या स्मारका समोर ओझरे आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दीप प्रज्वोलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
शहीद वजीर रस्ते यांच्या स्मारकाला ओझरे येथील सर्व रस्ते परिवार व ग्रामस्थ यांनी नतमस्तक होऊन प्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी वीरपिता व वीरमाता यांच्या डोळ्यात अश्रू अनावर आले.
ओझरे येथील वीर पुत्र कारगिल शहीद वजीर रस्ते यांच्या शहीद दिना निमित्त वीरपिता दत्तात्रय रास्ते व वीरमाता बायडाबाई रास्ते बोलत असताना म्हणाले की,
भारत देशाच्या संरक्षणासाठी वजीर रास्ते हा शहीद झाला याच आम्हाला दुःख नाही परंतु शहीद वजीर रस्ते यांना देशाची सेवा करण्यासाठी मिळालेली संधी हे जीवनात किती मोठे भाग्य मिळाले.याचा आम्हाला आनंद वाटत आहे. परंतु कारगिल युद्धामध्ये आमचा मुलगा वजीर रास्ते देशाच्या संरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता लढतच राहिला.काही कालावधी मध्ये देशाची सेवा केली आणि 26 वर्षांपूर्वी भारत मातेच्या भूमिमध्ये अखेरचा श्वास घेतला. हे आमचे दुःख विसरू शकणार नाही.
वीर सुपुत्र वजीर रस्ते यांच्या शहीद दिना निमित्त वीरमाता पिता यांचे उद्गार.
तसेच या कार्यक्रमासाठी अकलूज सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सरूपराणी मोहिते पाटील व पोलीस पाटील वर्धमान बोडके यांनी ओझरे येते भेट देऊन वजीर रस्ते यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ओझरे गावांमध्ये वृक्षारोपण व रक्तदान शिबिरही घेण्यात आले.50 हून अधिक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदानाचा हक्क बजावला.
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आधी जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी माजी सैनिक, पदाधिकारी, इतर भागातून आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तरुण कार्यकर्ते व विविध क्षेत्रातून आलेले सर्व पदाधिकारी समस्त ग्रामस्थ यांनी आपली उपस्थिती लावली.
चौकट…
शहीद सैनिक वजीर रस्ते यांच्या कुटुंबासाठी शासन नियमा प्रमाणे जमीन मिळण्यासाठी वीरपिता यांची मागणी.
कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
वीरपिता दत्तात्रय रास्ते यांनी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.



