कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- नागपुर जिल्हातील एकमेव पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय नवेगावखैरी येथे आहे.या विद्यालयात १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्या डॉ.जरीना कुरैशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी स्काऊट,एन.सी.सी व सर्व सदनाच्या विद्यार्थ्यांनी मार्च परेड चे शानदार प्रदर्शन केले.बैंड पथकाने सुंदर बैंड वाजवित सोहळा शानदार केला.
या प्रसंगी बोलतांना प्राचार्या डॉ.जरीना कुरैशी यांनी देशा करीता प्राण अर्पण करणाऱ्या वीरांना आदरांजली वाहिली व देशाने मला सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी देशाची ॠणी आहे,विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून देशाच्या विकासासाठी प्रयत्न करावे असे आवाहन प्राचार्य जरीना कुरेशी यांनी केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यात देशभक्ती गीतांवर डांस सादर केले,कार्यक्रमा नंतर उपप्राचार्य एम.यशोधरा यांनी,”संगीत शिक्षक आनंद तुला,कलाशिक्षक विनोद गडपाल,शारीरिक शिक्षक गुरूदेव टोलचे मिथिंगा आदिचे व स्काऊट गाईड,एनसीसी व इतर मान्यवरांचे आभार मानले.



