Home Social स्वातंत्र्य दिना निमित्य विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

स्वातंत्र्य दिना निमित्य विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

       देशाच्या 79 व्या स्वतंत्र दिनाच्या वर्धापनदिनी दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

        ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.

         सामदा शाळेचे माजी विद्यार्थी जगन्नाथ नामदेवराव राणे(शिक्षक) व पंकज जगन्नाथ राणे यांनी,विद्यार्थ्यांत शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी नामदेवराव राणे व कमलाबाई नामदेवराव राणे यांच्या स्मृती पित्यर्थ शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांना रजिस्टर पेन,वह्या, या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

        यावेळी सरपंच योगिताताई हंबर्ड ,उपसरपंच छायाताई रायबोले , पोलिस पाटील नामदेव भगत ,ग्रामपंचायत सदस्य,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती नारोकर समस्त गावकरी मंडळी तसेच मुख्याध्यापक मधुकर चव्हाण केंद्रप्रमुख विनायक चव्हाण सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.