Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — मौजा कोटगाव ते जांभुळघाट रस्त्यावरील ट्रक व हायवा...

ब्रेकिंग न्यूज… — मौजा कोटगाव ते जांभुळघाट रस्त्यावरील ट्रक व हायवा चालकांनी केले फरार… — दखल न्यूज भारतच्या बातमीचा दणका… — मुजोर ट्रक व हायवा चालकांवर कारवाई होणे आवश्यक…

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादीका 

       चंद्रपूर जिल्हितंर्गत चिमूर तालुक्यात मौजा रामपूर ते कोटगाव-डोमा-मुग्दाई रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम सुरू आहे.या रस्त्याच्या कामासाठी ट्रक व हायवा मध्ये ओव्हर लोड मटेरियल भरुन मौजा जांभुळघाट ते मौजा कोटगाव या रस्त्याने वाहतूक केली जात आहे.

      आणि आवागमन करणाऱ्या सदर रस्त्यावर ट्रक व हायवा घंटोतक उभे करून ठेवले जात आहेत.आज सकाळी ट्रक व हायवा चालकांना पत्रकार उपक्षम रामटेके यांनी त्यांची वाहणे रस्त्याच्या कडेला उभे ठेवावे असे म्हटले असता,मुजोर चालकांनी उर्मट भाषेत उत्तर देत आमची वाहणे रस्त्यावरच उभी ठेवू असे म्हटले.

       याचबरोबर आमचे कुणी वाकडे करु शकत नाही असे धमकी युक्त शब्द ट्रक व हायवा चालक बोलले.

        यासंबंधाची बातमी,”दखल न्यूज भारत ला,प्रकाशित होताच सदर चालक आपले ट्रक व हायवा घेऊन मोका स्थळावरुन फरार झाले.

      कदाचित भिसी पोलिस ताफा कोटगावकडे येत असल्याची भनक त्यांना लागली असावी असे वाटते आहे.

          मात्र संबंधित ट्रक व हायवाच्या नंबर वरुन ट्रक व हायवा मालक कोण आणि त्या वाहणाचे चालक कोण आहेत हे कळत असल्याने भिसी पोलिसांनी संबंधित ट्रक व हायवा चालकांवर कारवाई केली पाहिजे या मताचा कायदा आहे.

        रामपूर ते कोटगाव-डोमा-मुग्दाई रस्त्याच्या कामासाठी मटेरियल वाहतूक करणारे ट्रक चालक व हायवा चालक हे वाहण मालकांच्या आणि ठेकेदारांच्या बलावर पत्रकारांशी बोलताना मुजोरी करतातात काय? आणि उर्मट भाषेचा उपयोग पत्रकारांसोबत करतात काय?

      मौजा कोटगाव वाशियांना आवागमन करण्यासाठी नाहक त्रास देणाऱ्या त्या मटेरियल वाहतूक करणाऱ्या वाहण चालकांवर कारवाई केली पाहिजे असे कायदा सांगतो आहे.

        म्हणूनच संबंधित ट्रक चालक व हायवा चालक हे आपली वाहणे घेऊन कुठेही फरार झाले असतील तरी त्यांना शोधून काढण्याचे काम वाहतूक विभागाचे व पोलीस विभागाचे काम आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.