Home उपक्रम ग्रामगीता महाविद्यालयात,’हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध स्पर्धा आयोजित…   

ग्रामगीता महाविद्यालयात,’हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध स्पर्धा आयोजित…   

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

     देशभरात 2 अगस्त ते 15 अगस्त 2025 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आला आहे.ग्रामगीता महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून या अभियानात सक्रिय सहभाग करवून घेण्याकरिता विविध स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.

        दिनांक 2 अगस्त ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत महाविद्यालयाची प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांच्या अध्यक्षतेखाली,राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, ‘राष्ट्रीय चिन्हे’ या विषयावर रांगोळी स्पर्धा आणि ‘आपला राष्ट्रीय ध्वज’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या सहभाग होता.

        देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत मुकेश देवानंद भिमटे,कु. पल्लवी शांताराम गजभे,कु. कल्याणी नामदेव पंधरे,आणि कु. समीक्षा आनंदराव वाकुडकर यांना विजेते घोषित करण्यात आले.

        निबंध लेखन स्पर्धेत संदीप विलास जीवतोडे,वैभव सुरेश बारेकर,कु.कल्याणी नामदेव पंधरे,आणि कु.सेजल प्रमोद लोखंडे या विद्यार्थ्यांना,तसेच रांगोळी स्पर्धेत कु.गौरी विलास चंदनखेडे,कु.सविता तारनाथ नन्नावरे,कु.रेवती शंकररावजी बुटे आणि कु.मोहिनी मोरेश्वर देवतळे या विद्यार्थ्यांना विजेते घोषित करण्यात आले.

       दिनांक 15 ऑगस्ट, 2025, रोज शुक्रवार ला,सकाळी प्राचार्यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर,विजेते विद्यार्थ्यांना मंचावर उपस्थित पाहुण्यांचे हस्ते प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ,आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

       या कार्यक्रमात,प्राचार्य डॉ.सुनंदा आस्वले यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला होता.

         याचबरोबर डॉ.संदीप सातव,डॉ.हुमेश्वर आनंदे,आणि प्रा.संदीप मेश्राम,पाहुणे म्हणून उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी,डॉ. बिजनकुमार शील यांनी केले.