Home Vidarbha चिमुर तालुका माध्यमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकपदी विनोद पिसे चौथ्यांदा विजयी…

चिमुर तालुका माध्यमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकपदी विनोद पिसे चौथ्यांदा विजयी…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

       शिक्षक बांधवांच्या आर्थिक गरजा पूर्तीसाठी चिमुर तालुक्यांतील छोट्या छोट्या शाळांना एकत्रित आणून सन 2010 मध्ये चिमूर तालुका माध्यमिक शाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था मधुकर गेडाम मुख्याध्यापक तळोधी यांच्या मार्गदर्शनात निर्माण झाली.

      सन 2010 मध्ये श्री.भक्तदासजी जिवतोडे मुख्याध्यापक जय लहरी जय मानव विद्यालय मदनापूर यांची अध्यक्षपदी तर श्री.विनोदभाऊ पिसे यांची सचिवपदी नियुक्त झाली होती. 

       श्री.विनोदभाऊ पिसे साईबाबा विद्यालय आमडी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.२०१० ते २०२५ अशी १५ वर्षे ते सचिवपदी विराजमान होते.२०२५ मध्ये झालेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत ४ थ्या दा संचालकपदी विजयी झाले…

      २०२५ मध्ये माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक पतसंस्था चंद्रपूर च्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे.

       आतापर्यंत चंद्रपूर जिल्हा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ चंद्रपूरचे १२ वर्षापासून संचालक असुन ६ वर्षापासून सचिव पदावर कार्यरत आहेत.

       शैक्षणिक व सामाजिक कार्यात ते नेहमी अंग्रेसर आहेत.याचबरोबर श्री.संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमुरचे ते सदस्य आहेत.त्यांच्या विजयाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनचा वर्षाव चौहुबाजूंनी करण्यात येत आहे.