Home देशविदेश अन्यायग्रस्त उपोषणकर्त्याला भर रस्त्यात सिने स्टाईलने लाथ मारणाऱ्या उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांना...

अन्यायग्रस्त उपोषणकर्त्याला भर रस्त्यात सिने स्टाईलने लाथ मारणाऱ्या उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांना महाराष्ट्र सरकारने सेवेतून तात्काळ बडतर्फ केले पाहिजे… — त्यांच्यावर फौजदारी कारवाई सुध्दा झाली पाहिजे…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक..

     जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील १ महन्यांपासून अमीत चौधरी व गोपाल रमेश चौधरी हे दोघे आरोपींना अटक करावी म्हणून उपोषण करीत आहेत.

         उपोषणकर्ते हे आज मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना भेटण्यासाठी प्रयत्न करीत होते.याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस आरोपींना अटक करीत नसल्याने शासन प्रशासनाच्या लालफितशाही अंतर्गत वैतागलेल्या उपोषणकर्त्यांनी अखेर १५ ऑगस्ट ला आत्मदहन करणार असल्याचे लेखी द्वारे म्हटले होते.

          मात्र,उपोषणकर्ते हे तब्बल १ महिन्यांपासून उपोषण करीत असताना जालना जिल्हाचे जिल्हाधिकारी व जालना जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी उपोषणकर्त्यांची अजिबात दखल घेतली नाही,या त्यांच्या असंवेदनशील कृतीला आणि बेजबाबदार कर्तव्याला काय म्हणावे?

         उपोषणकर्त्यांची मागणी होती की,आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर करावे.मात्र उपोषण कर्तव्यांची मागणी रास्त असल्यास किंवा रास्त नसल्यास पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगायला पाहिजे होते व आरोपींना अटक करण्याची मागणी कायदेशीररित्या रास्त आहे की नाही याबाबत लेखी पत्रव्यवहार उपोषण कर्त्यांसोबत करायला हवा होता.

          याचबरोबर स्वातंत्र्य दिनी म्हणजे १५ ऑगस्ट २०२५ ला आत्मदहन करण्याबाबत लेखीपत्र उपोषण कर्त्यांनी दिले असताना पोलिसांनी त्यांची भूमिका व त्यांच्या प्रकरणाची वास्तव बाजू का म्हणून समजून घेतली नाही? हा एक प्रकारचा शासन-प्रशासनाच्या गलथान कारभाराचा कळसच नाही काय?

         उपोषण कर्त्यांला जालना पोलिस रस्त्यांवरुन पायदळ घेऊन जात असताना उप अधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी आज स्वातंत्र्य दिनी उपोषण कर्त्यांच्या कमरेवर मागवून लाथ मारली असल्याचे व्हिडिओ फेसबुकवर शेअर झाले आहेत.हा व्हिडिओ सत्य घटनाक्रामाला अनुसरून असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

         १५ ऑगस्ट म्हणजे देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनी उपोषण कर्त्यांला भर रस्त्यात अनंत कुलकर्णी नावाच्या उपअधीक्षक पोलिस अधिकाऱ्यांनी मागवून लाथ मारणे हे कुठल्या नियमात बसते? आणि भर रस्त्यात उपोषण कर्त्यांला मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना आहे काय?याचे वास्तव्य महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेसमोर मांडले पाहिजे.

            महाराष्ट्र राज्यातंर्गत जनतेवर पोलिस विभागाकडून होणारा अन्याय व अत्याचार असाह्य आहे.यामुळे भर रस्त्यात उपोषण कर्त्यांला मारणाऱ्या जालना येथील पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांना महाराष्ट्र सरकारने ताबडतोब निलंबित केले पाहिजे व त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी वेगाने कार्यप्रणाली अवलंबली पाहिजे,असेच जालना पोलिस उपअधीक्षकांच्या बेजबाबदार व अत्याचार कृतीचे प्रकरण आहे.

      तद्वतच बेजबाबदार कृती करणाऱ्या सदर अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र सरकारने किंवा पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई केली पाहिजे असे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या भावना आहेत.

*****

     (टिप:- मात्र,उपोषण कर्त्यांचे गाव व तालुका काय आहे हे अजूनही माध्यमातून किंवा प्रत्यक्ष समोर आले नाही.लोकमत इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रथमदर्शनी बातमीला अनुसरून बातमी घेण्यात आली आहे.)