राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी..
स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राम पंचायत सोनसरी येथे प्रथम नागरिक मीनाक्षी वटी यांच्या शुभहस्ते आज राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि देशातील नागरिकांचे हक्क यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय उत्सवाच्या प्रसंगी ग्रा.प.सचिव कुमरे मॅडम,रामटेके मॅडम,उपसरपंच झुनुकलाल आचला,ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आवीका सोंसरी सभापती जुमनाके,उसभापती राजेंद्र रामटेके संचालक,ग्रामिक विकास विद्यालय मुख्याध्यापक प्रफुल जनबंदू,शिक्षक वृंद,विद्यार्थी,आश्रम शाळा येथील मुख्याध्यापक मिसार सर,शिक्षक,विद्यार्थी,जिल्हा परिषद शाळा येथील मुख्याध्यापक हलामी,पी.एस.सी.डॉक्टर धारणे मॅडम,कर्मचारी पालक,महिला,गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.



