Home Social राजे फाउंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिना निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शूज वाटप…

राजे फाउंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिना निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शूज वाटप…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी– स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर राजे फाउंडेशन तर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत पंडित जवाहरलाल स्कूल,रेल्वे स्टेशन रोड कन्हान येतील गरजू विद्यार्थ्यांना एकूण १११ नवे जोड शूज वाटप करण्यात आले.

      विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील चमक या उपक्रमाचे खरे यश ठरले.

      कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक कार्य करणारे राजनजी वियनवार,मुसाब अन्सारी, शस्वप्नील शर्मा,माजी सरपंच कैलासजी भिवगडे,अभिजीत चंदूरकर,अमर मोहबे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

     राजे फाऊडेशनचे अध्यक्ष केतनजी भिवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रवीणकुमार साबरे सर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

       या उपक्रमात रोशन सोनटक्के,रितेश जनबंधू,शुभम चहांदे,आर्यन मेश्राम,महिमा शेंडे,आर्या भिवगडे,अपेक्षा मेश्राम,श्रुती मेश्राम यांनी मनापासून परिश्रम घेतले.

        अनेक गरिब विद्यार्थ्यांकडे योग्य पादत्राणांची सोय नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर व शिक्षणावर परिणाम होतो,हे लक्षात घेऊन राजे फाउंडेशन ने हा उपक्रम राबविला. 

      “एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणणे, हाच आमचा सर्वात मोठा पुरस्कार आहे,” असे अध्यक्ष केतनजी भिवगडे यांनी सांगितले.