राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी..
आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 ला गडचिरोली जिल्हातंर्गत कुरखेडा तालुक्यातील मौजा सोनसरी येथे भात पिकाची महिलांची शेती शाळा प्रत्यक्ष कृतीतून घेण्यात आली.
या शेती शाळेत महिलांना धान लागवडीच्या विविध पद्धती आणि धान पिकावर येणारी कीड व रोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
श्री.बी.के.कुलंसंगे सहाय्यक कृषी अधिकारी बांधगाव आणि जी.के.जल्लेवार सहाय्यक कृषी अधिकारी सोंसरी यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन शिबीर यशस्वी करण्यासाठी दिनेश समर्थ यांचे सहकार्य लाभले.



