भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंडवांना समिती होचेटोला व मरारटोला च्या वतीने मारायमाता चौक मरारटोला येथे कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम आदिवासी देवी देवतांची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुरारी हलामी माजी उपसरपंच पन्नेमारा उदघाटक शेवन्ता हलामी सरपंच पन्नेमारा व पन्नेमारा येथील सर्व ग्रामपंचयात सदस्य गावकारी उपस्थित होते.
यामध्ये सरपंच हलामी यानि आपल्या संस्कृती पंरपरा रितिरिवाज जपली पाहिजे असे मार्गदर्शन केले व आपल्या समाज हा शिक्षणापासून कोसो दूर होता पण आता चित्र बदलत असून आज शिक्षण घेणे महत्वच आहे व आज आपले हक्क व अधिकार माहित केले पाहिजे तेव्हाच समाजचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन युवा समाजसेवक संतलाल हलामी यांनी केले.
या कार्यक्रमा दरम्यान व आदिवासी नृत्य गाणे येथील महिलानी सादर केले या मध्ये माजी सरपंच मुरारी हलामी तागडे सर संतलाल हलामी यांनी आदिवासी गाणे सादर केले यावेळी प्रकाश हलामी उपसरपंच प्रभाकर हलामी पोलीस पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तागडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संतलाल हलामी यांनी केले.



