ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : सळाखीने खड्डे करून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावताना पाहून असेही वृक्षवेड असू शकते हे उघड झाले. तो त्यांचा छंद आहे छंद जोपासताना होत असलेले पर्यावरण संवर्धनाची कार्य लाखमोलाची.
वयाने 60 वर्षे असलेले कुमार रामटेके या वृक्षप्रेमी चे नाव साकोलीच्या एम.बी.पटेल कॉलेज मार्गावर ऊन पावसाची चिंता न करता हातात सळाख आणि काही रोपटे व झाडांच्या कलमा घेऊन रस्त्याने वृक्षारोहण करताना दिसले रस्त्याच्या कडेला खड्डे करून झाडांची रोपण करणे हा त्यांचा छंद. खाजगी महाविद्यालयात कंत्राटी ग्रंथपाल म्हणून नोकरी परंतु वेतन कमी मात्र त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांच्याकडून घडणारे कार्य लाख मोलाचे असेच आहे मुळ नवेगावबांध जवळील चापटी गावचे परंतु ते पंचशील वार्ड साकोली येथील निवासी आहेत यांना लहानपणापासूनच वृक्ष लागवडीचा छंद जोपासला होता ही आवड पाहून त्यावेळी मारुती चितमपल्ली यांनी मार्गदर्शन केले.
आज पर्यंत रामटेके यांनी पाच हजाराहून अधिक झाळांची लागवड केली. यांनी तिरुवनंतपुरम ,तोतलाडोह ,साकोली येथील ग्रंथालय प्रांगण, बौद्ध विहार प्रांगण,एम.बी.पटेल कॉलेज प्रांगण, महामार्गाच्या शेजारी त्यांनी असंख्य झाडे लावले ते केवळ झाडच लावत नाही तर त्यांची निगा राखणे ,पाणी देणे ,कचरा काढणे ,व रात्री बेरात्री फेर फटका मारण्यासाठी निघतात या वृक्षप्रेमी च्या उपक्रमाचे कौतुक जया भुरे, मार्तंड नगरकर, व्यंकटेश येवले, नरेश भुरे, महेश पोगडे, शिलादेवी वासनिक तसेच परिसरातून कौतुक केले जात आहे.



