दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
भारतीय सेनेतील जवान श्री.अविनाश शामराव खेडेकर हे नागभिड तालुक्यातील मौजा मोहाडी वरुन चिमूर तालुक्यातील मौजा कळमगाव येथे जात असतांना जांभुळघाट ते नेरी मार्गावर त्यांचा ट्रॅक्टरची कॅचबिन लागून अपघात झाला.
हा अपघात मौजा नेरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा रामपूर फाट्या जवळ झाला असून अपघातात भारतीय सेनेतील जवान जागीच ठार झाले.

रक्षाबंधन असल्याने जवान अविनाशची पत्नी व लहान भावाची पत्नी या भावाला राखी बांधण्यासाठी बस ने मौजा कळमगावला आल्या होत्या.त्यांना घेण्यासाठी जवान श्री.अविनाश शामराव खेडेकर हे मौजा कळमगाव ला जात होते.
भात पिकाच्या रोवणीची चिखलटी करणाऱ्या ट्रॅक्टरची कॅचबिन जवान अविनाश यांच्या बाईकला जोराने लागल्याने अपघात झाला.राॅयल इंनफिल्ड कंपनीची मोटारसायकल असून तिचा क्रमांक एम.एच.३४,-बि.डब्लू १०० असा आहे.
सामाजिक कार्यकर्ते पिंटू खाटीक यांनी अपघाताची बातमी चिमूर पोलिसांना दिली.यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर श्री.अविनाश शामराव खेडेकर यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हातंर्गत उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला.(अपघात भारत देशातंर्गत महाराष्ट्र राज्यातील,चंद्रपूर जिल्ह्यात झालेला आहे )
मृतक भारतीय सेनेच्या जवानाच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.मात्र अपघात करणारा ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन फरार झाला आहे.



