शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चंद्रपूर :- नलेश्वर तलाव चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आहे.चंद्रपूर पासून ७७ किलोमीटर अंतरावर तर सिंदेवाही पासून १८ किलोमीटर अंतरावर नलेश्वर तलाव वसलेले आहे.ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पात नलेश्वर तलावाचा समावेश होतो.
सन १९१४ मध्ये ब्रिटिश काळात नलेश्वर तलावाची निर्मिती झाली. तलावामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटला आहे.आजूबाजूच्या गावाच्या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्न नव्हे तर मूल पर्यंतच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न नलेश्वर तलावामुळे सुटलेला आहे.नलेश्वर तलावाच्या अगदी जवळच ब्रिटिश कालीन दर्गा आहे.पर्यटक लोक तिथे सुद्धा भेट देत असतात.गाई मुख असून वर्षभर गाईच्या कोरीव मुखातून झरा वाहत असतो.जुने ब्रिटिश कालीन रेस्ट हाऊस मोडकळीस आले असून त्याचे अवशेष अजूनही दिसून येतात.
ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पात नलेश्वर तलावाचा समावेश होत असल्यामुळे निसर्ग सौंदर्याने बहरलेले नलेश्वर तलाव बघण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे.
पावसाळ्यात वॉटर फॉल ची भुरळ पर्यटकांना आकर्षित करत असते.वन्य प्राणी बघणारे पर्यटक सुद्धा नलेश्वर तलावाला मोठ्या संख्येने भेट देत असतात.
त्यामुळे नलेश्वर तलावाची पर्यटन स्थळ म्हणून विकसित करून नलेश्वर तलावात बोटिंग,गार्डन,आदींचा विकास करून वन्यजीवा पासुन रक्षणाची पुरेपूर व्यवस्था करून तसेच तलावात बुडून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशिक्षित पोहण्याचा सराव असणाऱ्याची नियुक्ती करून कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची काळजी घेऊन नलेश्वर तलावाला पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करावे अशी गौतम गेडाम यांनी मागणी केली आहे.



