शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
दरवर्षी दिनांक २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो.”जागतिक व्याघ्र दिन, ज्याला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून ओळखले जाते.हा वाघांच्या संवर्धणासाठी जागरूकता निर्माण करण्याससाठी,ग्रामपंचायत सातारा येथे दिनांक २९जुलै रोजी सातारा या गावाला साजरा केला जातो,वाघांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणे,वाघ हा परिसंस्थेचा एक महत्वाचा भाग आहे,आणि त्यांचा संरक्षणाने जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत होते.
वाघाच्या संख्येत घट झाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो,त्यामुळे त्यांचा संरक्षणाने आणि त्यांचा अधिवासाचे संरक्षण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
याप्रसंगी सातारा गावचे सरपंच श्री गजानन गुळधे,ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प उपसंचालक श्री.रेड्डी,वनपरीक्षेत्र अधिकारी कोलारा श्री.वैध,वनपरीक्षेत्र अधिकारी खडसंगी राऊत मॅडम,क्षेत्र सहायक श्री.गुरनुले,वनरक्षक श्री.बोपचे,ग्रामपंचायत पदाधिकारी ई,डी.सी.समिती पदाधिकारी,वन कर्मचारी,शालेय विध्यार्थी व ग्रामवाशी उपस्थित होते.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प उपसंचालक रेड्डी साहेब यांचे मनोगत सातारा गाव हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात स्वछ व सुंदर गाव, सातारा गावाचे आदर्श घेण्यासारखे आहे, गावातील शाळा,अंगणवाडी क्रिडांगण,वाचनालय,व्यवस्थापन केंद्र,सार्वजनिक शौचालय,व्यायाम,शाळा,जलशुद्धिकरण यंत्र,गरम पाण्याचे सयंत्र,महिला रोजगार केंद्र,महिला बचत गट,उमेद केंद्र अशा विविध सुख सोयी आदर्श ग्रामपंचायत सातारा व सातारा गावचे युवा सरपंच श्री गजानन गुळधे यांनी गावाकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या.
सातारा गावचे सरपंच श्री.गजानन गुळधे यांचे उपसंचालक रेड्डी साहेबांनी कौतुक केले व सातारा गावात व्याघ्र दिन साजरा करून व्याघ्र दिनाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले.










