शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथील रहिवासी सहकार क्षेत्रातील गाडे अभ्यासक्रम राजनैतिक तज्ञ व नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश घेवून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर अविरोध निवड येवुन सिडीसीसी बॅंकेच्या उपाध्यपदावर विराजमान झालेले संजयभाऊ डोंगरे यांचा नेरी ग्रामपंचायत तर्फे सरपंच तथा सदस्यांचे वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच रेखाताई पिसे, उपसरपंच चंद्रभान कामडी,ग्रा.पं सदस्य संगीता कामडी, संगीता वैरागडे,सरीता जनबंधु,साधना दडमल, पद्मश्री संजय नागदेवते, ग्रामपंचायत अधिकारी राजेश कांबळे, निखिल पिसे,वसंता कामडी,पिंटु खाटीक,राजु घोनमोडे, व ग्रामपंचायत कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.



