Home Maharashtra आता भांडवलदार पोशिंद्यांचे बेजबाबदार बाशिंदे जांभुळघाट बिटात करणार देशी दारुचा अवैध पुरवठा?

आता भांडवलदार पोशिंद्यांचे बेजबाबदार बाशिंदे जांभुळघाट बिटात करणार देशी दारुचा अवैध पुरवठा?

 रोखठोक 

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

        देशी दारुचा अवैध पुरवठा करणे म्हणजे स्वतःसह इतरांना आर्थिक बाबतीत मालामाल करणे होय आणि मद्यपींचे संसार उघड्यावर आणणे होय,त्यांच्या आर्थिक स्थितीचे दिवाळे काढणे होय,असे जनमत आहे.

         मात्र,भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत जांभुळघाट बिटामध्ये अवैध मार्गाने देशी दारुचा पुरवठा करण्यासंबंधाने आता नवीनच व्यक्तीचे नाव लोक चर्चेत असून सदर व्यक्ती हा चिमूर नगरपरिषद हद्दीतील रहिवासी असल्याचे समजते आहे.

           म्हणूनच आता भांडवलदार पोशिंद्यांचे बेजबाबदार बाशिंदे जांभुळघाट बिटामध्ये अवैध दारुचा पुरवठा करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची जनमानसात खमंग चर्चा आहे.

         “घरी आहे सर्व,पण मन भटकतय रानोरान,या उक्तीप्रमाणे अवैध व्यवसायाला चालना देणारे जबाबदार व्यक्ती हे पडद्याआडचे समाजद्रोही असतात.त्यांना समाजाच्या उन्नतीसी आणि गोरगरिबांच्या संसारांसी काही लेनेदेन राहात नाही हेच पांढरपेशी बाशिंदे न बोलता सांगून टाकतात.

         मोठ्या भांडवलदारांच्या लहान भांडवलदारांना जांभुळघाट बिटामध्ये अवैध दारु पुरवठा करण्यासाठी मार्ग खुला होणार असेल तर स्थानिक बेरोजगारांनी उघड्या डोळ्यांनी बघायचे काय?आणि लादलेले कोणतेही निर्णय स्विकारायचे काय?हा प्रश्न अंतर्मुख करायला लावणारा आहे.

         बेजबाबदार कृतीमध्ये कार्यकर्त्यांचे हित जपण्यासाठी धडपड असेल तर मतदारांच्या प्रती अशीच धगधग असायला काय हरकत आहे?

           जनता बघत आहे चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील भिसी पोलिस स्टेशन हद्दीतील,जांभुळघाट बिटामध्ये आणि भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत येत्या काही दिवसांत अवैध दारु पुरवठा करण्यासंबंधाने कायकाय घडामोडी घडतात?…