Home कृषी पाऊस आल्याने शेतकरी लागले धान रोवनीच्या कामाला…

पाऊस आल्याने शेतकरी लागले धान रोवनीच्या कामाला…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

     मधल्या काळात पावसाने उसंत घेतली होती.यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकातंर्गत रोवणीला थांबविले होते.

        चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरु असल्याने आता शेतकऱ्यांनी भात पिकातंर्गत रोवणीला सुरुवात केली आहे.

       भात रोपांची लागवड करण्यासाठी बांध्यामध्ये चिखलटी (गढण) करणे आवश्यक असते.यामुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर द्वारे भात पिकांच्या शेतामध्ये चिखलटी करणे सुरु केले आहे.