Home देशविदेश आज आम्ही (भारतीय जनता) व्यवस्थेचे गुलाम,करतो राजकारण्यांना सलाम… — लेखाचा :-...

आज आम्ही (भारतीय जनता) व्यवस्थेचे गुलाम,करतो राजकारण्यांना सलाम… — लेखाचा :- उत्तरार्ध…

    “विभूतीपूजा लोकशाहीला घातक ठरते.:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर..

      आम्ही प्रत्येकजण ( भारतीय नागरिक ) आमच्या कुटुंबासाठी, परिवारासाठी अर्थात घरासाठी नैतिक नियम लावतो. त्या नियमाचे प्रत्येकजण आचरण करतो.जर कुणी त्यात कसूर केली तर आपण त्याला शिक्षा सुद्धा घरातील सर्वमिळून करतात.आणि तो नीट सुधारून वागायला सुद्धा लागतो. हा नियम अगदी कुटुंब प्रमुखाला सुद्धा लागू असतो.”

       तर मग जर आम्ही आमचे घर सुरक्षीत आणि कल्याणकारी ठेवण्यासाठी एवढे नेहमी जागृत असू……

     तर आम्ही आमचा समाज, आमचे राज्य,आमचा देश हा सुद्धा परिवार,कुटुंब अर्थात स्वतःचं घर का समजत नाही?

     इथे का आमची मती बेशुद्ध होते?

      हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला सुशिक्षित,पदवीधारक आणि जबाबदार नागरिक समजणाऱ्यांनी स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीला विचारावा.

      नेमकी हीच जागृती या देशात गेल्या 75 वर्षात होऊ शकली नाही. म्हणून विभूतीपूजेने सारी लोकशाही गिळंकृत केली. म्हणून आम्ही या राजकारण्यांचे गुलाम होऊन सलाम करू लागलो.

     भारताच्या संविधानाने आम्हाला ……”आम्ही भारताचे लोक…आणि स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करण्याचे आवाहन केलेले असताना…!”

       आम्ही मात्र स्वतःच्या घरापुरतेच हे स्वार्थी आव्हान स्विकारल्यामुळे राज्याला,देशाला आम्ही वाऱ्यावर सोडलो. केवळ आमच्या कोरड्या अहंकारी धर्माच्या आंधळ्या कर्मकांडाच्या आहारी गेलो.नेमक्या याच मानसिकतेचा लाभ उठविण्यासाठी ही राजकारणी मंडळी तयार झाली.आणि आम्ही सुद्धा बिनदिक्कतपणे त्यांच्या चरणी सर्व पदव्या गहाण ठेऊन नतमस्तक होऊन लोटांगण घालण्यासाठी तयार झालो.

      परिणामी आमच्या देशातून अशा प्रकारच्या विभूतीपूजेच्या अमर्याद पीक आल्यामुळे आमच्या देशातून लोकशाही हद्दपार होऊन शेवटची घटीका मोजत आहे.

      या सर्व परिस्थितीला एकटा अनंत भवरे जबाबदार आहे. असं मी स्वतः कबूल करून,माझ्यातील उणीवा कायमच्या काढून टाकून या राज्यासाठी, या देशासाठी प्रथम जगेन आणि मग स्वतःसाठी व माझ्या परिवारासाठी जगेन….

       ते सुद्धा,प्रथमता आणि अंतिमता एक जबाबदार संविधाननिष्ठ भारतीय नागरिक म्हणून.

तुम्ही……

       आता या देशाचे दुश्मन हे खरे राजकारणी समजून,यांना संविधानिक मार्गांवर आणण्याचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाचे आहे. त्यासाठी येन केन प्रकारे कृतीतून सिद्ध व्हावे लागणार आहे….

     “कल करे सो आज कर,आज करे सो अब…

   पल मे प्रलय हो जाएगा,तो फिर करेगा कब?…

      निदान अमेरिका इंग्लंड प्रमाणे तरी जागृत नागरिक होण्याचा प्रयत्न करूया…..

आवाहनकर्ता तथा जागृतीचा कृतिशील लेखक.. 

       अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर, 7875452689..‌