जशी व्यवस्था आहे तशी परिस्थिती निर्माण होते आणि जशी परिस्थिती आहे तसे विचार निर्माण होतात, याचा अर्थ परिस्थितीचे कारण व्यवस्था आहे आणि विचाराचे कारण परिस्थिती आहे.
व्यवस्था दोन प्रकारचे असते, एक विषमतेची व्यवस्था म्हणजेच विषमतावादी व्यवस्था. दोन दुसरी व्यवस्था म्हणजे संमतीची व्यवस्था म्हणजेच समतावादी व्यवस्था. जशी व्यवस्था तशी परिस्थिती निर्माण होत असते उदाहरणार्थ जर विषमतेची व्यवस्था असेल तर परिस्थिती मध्ये पण विषमताच असणार आणि जर समतेची व्यवस्था असेल तर परिस्थिती पण समतेचीच असणार.
विषमतेची व्यवस्था ही विकृत भाव निर्माण करते आणि समतेची व्यवस्था ही माणसांमध्ये संस्कृत भाव निर्माण करते म्हणजेच समतेचा भाव निर्माण करते समता याचा अर्थ इतराबद्दल समभाव सम्यक दृष्टी समान विचार समान संधी, समान वागणूक. विश्वास श्रद्धा भक्ती निष्ठा प्रेम आदर अवजारे सहकार्य, दया क्षमा शांती सत्य न्याय नीती, असे भाव किंवा असे विचार म्हणजेच समता होय. हे सारे सदगुण समतेच्या व्यवस्थेतच निर्माण होतात आणि ते टिकूनही राहतात.
विषमतेच्या व्यवस्थेत मात्र वरील सर्व सद्गुण निर्माण होत नाहीत आणि झाले तरी ते टिकत नाहीत. उलट माणसात शारीरिकृत होऊन निर्माण होतात आणि अशा विकृत कुणाला विषमतावादी व्यवस्था ही प्रोत्साहन देत असते. म्हणूनच अशा व्यवस्थेत जास्तीत जास्त सज्जन लोक ऐवजी दूर होऊन लोकच यशस्वी होतात. विकृती म्हणजे अहंकार अतिसार मान नाया द्वेष मत्सर सोडभावना दृष्ट भावना त्या देऊन म्हणजेच विकृत गुण. विषमतावादी व्यवस्थेत अशा गुन्हा भरपूर संधी असते म्हणून अशा व्यवस्थेत गुंड गिरी करणारे दादागिरी करणारे तसेच चोऱ्या मारामाऱ्या करणारे भामटेलो तरोडेखोर खुनी निर्माण होतात आणि सारे परिस्थिती बदलते म्हणजेच वाईट परिस्थिती निर्माण होते. माणसाचे भाव पण बदलतात. जातीभेद धर्मभेद वर्ग भेद हे सारे भेद विषमतावादी व्यवस्थेमुळेच निर्माण झालेले आहेत. समतावादी व्यवस्था असली असती तर हे सारे भेद असमानता असमान संधी निर्माण झाले नसते.
विषमतेच्या म्हणजेच विषमतावादी व्यवस्थेच्या मुळेच आर्थिक सामाजिक राजकीय विषमता निर्माण झालेले आहे. धर्मपण दूषित झालेल्या आहेत. रेशमी व्यवस्थेत मुळेच भांडवलशाही सरंजामशाही आणि त्यातून हुकूमशाही जन्माला येते. समतेच्या व्यवस्थेत लोकशाही जन्माचे येते. पण ह्या लोकशाहीची परिस्थिती सुद्धा विषमता की समस्या समता ची व्यवस्था यावर लोकशाहीची अवस्था अवलंबून असते जसे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील लोकशाही ही भांडवली लोकशाही असते म्हणजेच ही लोकशाही पैशावर चालत असते म्हणजेच पैसे देऊन विकत घेता येते. समतेची व्यवस्था असेल तर खरी लोकशाही अस्तित्वात असते म्हणजेच या व्यवस्थेत लोकशाहीचा बाजार होत नाही म्हणजेच मते विकत घेता येत नाहीत. म्हणून विषमतावादी व्यवस्थेतील लोकशाही ही खोटी लोकशाही असते आणि समतावादी व्यवस्थेतील लोकशाही ही खरी व्यवस्था असते आणि खरी लोकशाही असते.
विषमतेच्या व्यवस्थेत आर्थिक विषमता निर्माण होऊन गरीब मध्यम श्रीमंत असे तीन वर्ग निर्माण होतात तसेच विषमतेच्या व्यवस्थेत सामाजिक विषमता निर्माण होते म्हणजेच जातीव्यवस्था आणि धर्म व्यवस्थापन निर्माण होते आणि त्यात एक जात नसून अनेक जाती असतात तसेच एक धर्म नसून अनेक धर्म असतात केवळ असतातच असे नव्हे तर त्यांची मध्ये द्वेष आणि मत्सर निर्माण होतो जातीचा आणि धर्माचा अहंकार निर्माण होतो त्यातून भांडणे मारामाऱ्या खून खराबी मालमत्तेचा विध्वंस होत असतो म्हणजेच विषमता ही हिंसा निर्माण करीत असते आणि समतेची व्यवस्था ही अहिंसा निर्माण करीत असते. विषमतेची विषमतावादी व्यवस्था आणि समतेची समतावादी व्यवस्था या दोन व्यवस्थेमध्ये एवढे मोठे अंतर आहे हे प्रत्येक भारतीय नागरिकांनी समजून घेण्याची नितांत गरज आहे.
विषमतेची व्यवस्था ही विकृत असल्यामुळे अर्थातच अशा व्यवस्थेत सर्व निकृष्ट आणि पापीच गोष्टी घडणार आहेत तेव्हा अशा व्यवस्थेत पुण्याच्या कर्माचे किंवा विचाराचे अपेक्षा करणे म्हणजे भाबडेपणा ठरतो किंवा चुकीचे असते. कारण या व्यवस्थेत सत्य न्याय नीती याला थारा नसतो. दया क्षमा शांती, सत्य न्याय नीती ह्या संकल्पना फक्त समतावादी व्यवस्थेत म्हणजेच समतेची व्यवस्था असेल तरच या संकल्पना साकार होऊ शकतात किंवा तग धरू शकतात. विषमतावादी व्यवस्थेत सज्जन व्यक्तीने कितीही धर्माच्या नीतीच्या नावाने नैतिकपणे वागण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नसते म्हणजेच कितीही पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न केला तरीही पुण्याचे फळ हाती लागणे शक्य नसते कारण आपण विषमतावादी व्यवस्थेमध्ये वावरत असतो म्हणजेच या व्यवस्थेत विकृतीचे वातावरण असते म्हणजेच विकृत बुद्धीला संधी मिळेल असेच वातावरण या व्यवस्थेत असते. म्हणून कित्येक सज्जन माणसे सुद्धा कितीही चांगले वागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे हातून चुकीच्या गोष्टी होतच असतात म्हणजेच याचा अर्थ असा होतो की सज्जन माणसांच्या हातून होणाऱ्या चुका याला कारणीभूत ते स्वतः नसून किंवा त्यांचे समतावादी विचार नसून विषमतावादी परिस्थिती कारणीभूत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून चोर असो की साहू असो कुणालाही या व्यवस्थेत दोष देता येत नाही कारण विषमतावादी परिस्थिती ही विषमतेच्या व्यवस्थेमुळे निर्माण होते आणि या परिस्थितीमुळे माणसे चुकत असतात. आपण कितीही सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो असे म्हटले किंवा कितीही संतांच्या संगतीत राहिले सज्जनांच्या संगतीत राहिले तरीही आपले विचार बदलतात म्हणजेच विकृत होतात त्याचे कारण म्हणजेच त्याचा दोष त्याला देता येत नाही तर परिस्थितीच अशी असते की ती माणसाला मजबूर करत असते. कित्येक सज्जन लोक दुर्जन बनतात याचे कारणच ही विषमतेची व्यवस्था आहे.
म्हणून विषमता आणि विषमतावादी परिस्थिती आणि विचार तसेच समता आणि समतावादी परिस्थिती आणि विचार यातील फरक आणि परिणाम आपण समजून घेतल्याशिवाय आपणास परिस्थितीबद्दलता येणार नाही आणि परिस्थिती बदलल्याशिवाय व्यवस्था बदलणार नाही किंवा व्यवस्था बदलल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही आणि परिस्थिती बदलल्याशिवाय माणसाची विचार बदलणार नाहीत हे सारे एकमेकावर अवलंबून आहे. मग इथे प्रश्ना सापडतो की आधी व्यवस्था की आधी परिस्थिती? आधी परिस्थिती ही आधी विचार ? याचा खुलासा देताना असे म्हणावे लागेल की आपण ज्या परिस्थितीत असतो त्या परिस्थितीमध्ये आपणास समतेचे आणि विषमतेचे विचार म्हणजे काय हे आधी समजून घ्यावे लागेल आणि त्यानुसार आधी व्यवस्था बदलावी लागेल. आणि एकदा का व्यवस्था बदली की मग आपोआप अवस्था बदलल ते, आणि अवस्था बदली की परिस्थिती बदलते परिस्थिती बदलली की विचार बदलतात हा क्रम आपोआप लागतो. म्हणून आपण सर्वजण या विषमतावादी परिस्थितीमध्ये वावरत आहोत याचे भान ठेवले म्हणजे आपण एकमेकास दोष देणार नाहीत, कुणाला चांगले कुणाला वाईट म्हणायची पाळी येणार नाही, आणि ही विषमतेची परिस्थिती बदलण्यासाठी ही परिस्थिती बदलून म्हणजेच समतेची व्यवस्था आणण्यासाठी काय करायचे कसे करायचे? याचा आधी आपण विचार करूया.



