Home देशविदेश दिलीप श्रिरामेंचा विज पडून मृत्यू..

दिलीप श्रिरामेंचा विज पडून मृत्यू..

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

     नैसर्गिक आपत्तीपुढे कुणाचे काही चालत नाही हे अनेकदा सिद्ध झाले.आतातर निसर्ग असा कोपला आहे की शेतात काम करणाऱ्या महिला – पुरुषांनाही सोडत नाही..

         काल असाच दुर्दैवी घटनाक्रम चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पिंपळगाव (महाराष्ट्र राज्य/भारत देश) येथे घडला असून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर विज पडली व तो जागीच मृत्यू पावला.

      शेतकऱ्यांचे नाव दिलीप गुलाब श्रिरामे असून त्यांचे मृत्यू समयीचे वय ३५ वय आहे.तो रात्र होऊन सुद्धा घरी न आल्याने त्याची शेतात जाऊन नातेवाईकांनी शोधाशोध केली असता,तो विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

       सदर घटनेची माहिती महसूल विभाग चिमूर व पोलीस स्टेशन भिसी यांना देण्यात आली होती.सदर विभागाचे संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी मोका स्थळावर पोहचले व घटनेचा पंचनामा केला.

           यानंतर दिलीप गुलाब श्रिरामे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा उप रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला.

          दिलीप च्या नैसर्गिक मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.