Home Maharashtra चंद्रपूर सीडीसीसी बॅंकचे अध्यक्ष ते उपाध्यक्ष संजय डोंगरे आणि काँग्रेस – भाजपा...

चंद्रपूर सीडीसीसी बॅंकचे अध्यक्ष ते उपाध्यक्ष संजय डोंगरे आणि काँग्रेस – भाजपा पक्ष… — माजी आमदार डाॅ‌.अविनाश वारजूकर,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार ते आमदार किर्तीकुमार भांगडिया असा प्रवास…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथील रहिवासी असलेले श्री.संजय डोंगरे म्हटले की काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष म्हणजे संजय डोंगरे असे राजकीय व सामाजिक समीकरण आतापर्यंत सुरु होते.

        स्वतःच्या अस्तित्वासाठी नव्हे तर पदासाठी कोण कुठल्या पक्षात जाईल याचा नेम आता उरला नाही,हे सध्याच्या जुळवाजुळवीचे आणि स्वतःच्या फायद्याचे समिकरण समोर येवू लागले आहे.

        संजय डोंगरे हे मृदू भाषी व शांत आणि स्वयंमी स्वभावाचे आहेत.ते फार कमी बोलतात,पण तोलून बोलतात असा आजपर्यंतचा त्यांच्या बाबतीतला अनुभव माझा व इतरांचा!

        माजी मंत्री,आमदार विजय वडेट्टीवार यांचे ते खंदे समर्थक व अगदी जवळचे विश्वासू होत व आहेत असे समाजमन बोलतय!..

       राजकीय पक्षांच्या आमदारांचे व मंत्र्यांचे एकमेकांसी सलोख्याचे संबंध असतात आणि या सलोख्याच्या संबंधातूनच आपापल्या विश्वासू व्यक्तींची वर्णी जबाबदार पदावर केली जातय हे सुद्धा राजकीय घडामोडीचे फायदेशीर सुत्र सर्वश्रुत आहे..

          चंद्रपूर सीडीसीसी बॅंकचे तात्कालीन अध्यक्ष व आताचे उपाध्यक्ष संजय डोंगरे हे सहकार क्षेत्रात रममाण झाले असल्याचे दिसून येत आहे.ते चंद्रपूर सीडीसीसी बॅंकचे माजी अध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे त्याच बॅंकचे उपाध्यक्ष पद परत येणे फारशी महत्त्वपूर्ण बाब नाही…

           माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या राजकीय ताकदीच्या बलावर ते चंद्रपूर सीडीसीसी बॅंकचे अध्यक्ष झाले होते.या पदातंर्गत एक नवीन संधी संजय डोंगरे यांना मिळाली आणि महाराष्ट्र सत्तेच्या आशिर्वादात व आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात बॅंकेला स्थिरता देण्यासाठी व बॅंकेच्या आर्थिक मजबूतीकरणासाठी बरेच काही त्यांनी केले.याचबरोबर लांबलचक नौकर भरती सुध्दा त्यांनी अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केली होती..

           काँग्रेस पक्षांनी चंद्रपूर सीडीसीसी बॅंकचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांना जे दिले ते समाजमनाचे धन,पद,प्रतिष्ठा मरेपर्यंत न संपणारे आहे.म्हणूनच भाजपाने अर्थात आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी संजय डोंगरे यांना आपल्याकडे वळवून जनमानस आपल्या बाजूने करण्याचा डाव खेळलेला दिसतोय.

           हा डाव यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत बरेच खलबते करण्याकडे कल असणार आहे.पण,मतदार हे काँग्रेस पक्षाला माणणारे असल्याने ते आपल्याच ठिकाणी बरोबर असतात असेही वास्तव आहे.

           कारण काही असो संजय डोंगरे हे भाजपात गेले असल्याने आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर हे नेरी ग्रामपंचायत निवडणुकीत काय राजकीय डावपेच आखतात आणि मतदारांना आपल्या बाजूने कसे ठेवतात याबाबतचे राजकीय चित्र महत्वाचे ठरणारे आहे..

            तसेही भाजपा लोकहितासाठी वल्गना मोठ्या प्रमाणात करतय.पण,प्रत्यक्ष त्या पक्षाची कृती,धोरणे हे मात्र लोक विरोधी आहेत,लोकशाहीचे व लोकांचे दमन करणारे आहेत.

          उदाहरण द्यायचे झाल्यास जिल्हा परिषद शाळा बंद करणे,गोरगरिबांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊ नये म्हणून शिक्षण व्यवस्था माहागाडी करणे,अनुसूचित जाती जमाती वर्गाचा विकास निधी वेगवेगळ्या ठिकाणी वळवणे,देशातील नव मुलांना – मुलींना देशातील राजकारण,अर्थकारण,समाजकारण समजू न देणे,शासकीय नौकर भरती शासनाच्या द्वारे न करणे,भांडवलदारांच्या हितासाठी सर्वकाही करणे आणि महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा तयार करून नागरिकांचे मूलभूत अधिकार नाकरणे…

*****

 चंद्रपूर सीडीसीसी बँक – कंपनीबद्दल..

       सीडीसीसी बँक ही चंद्रपूर (भारत) येथे स्थित एक निधी नसलेली कंपनी आहे,ज्याची स्थापना १९१२ मध्ये झाली.ती सहकारी बँक म्हणून काम करते.

         सीडीसीसी बँकेने अद्याप कोणताही निधी उभारलेला नाही.कंपनीकडे ६३३ सक्रिय स्पर्धक आहेत,ज्यात एक बाहेर पडला आहे.तिच्या प्रमुख स्पर्धकांमध्ये अभ्युदय सहकारी बँक,भारत सहकारी बँक आणि सारस्वत सहकारी बँक सारख्या कंपन्यां समाविष्ट आहेत.

 सीडीसीसी बँकेची गुंतवणूक आणि अधिग्रहणे…

      चंद्रपूर सीडीसीसी बँकेने अद्याप कोणतीही गुंतवणूक किंवा अधिग्रहण केलेले नाही.

        सहकारी बँका त्यांच्या ग्राहकांच्या मालकीच्या असतात आणि त्या एक व्यक्ती,एक मत या सहकारी तत्त्वाचे पालन करतात.सहकारी बँका बहुतेकदा बँकिंग आणि सहकारी कायद्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात.

        सीडीसीसी बॅंकचे धोरणे लक्षात घेतले तर सहकार क्षेत्रात लोकविकासाला वेगवेगळ्या संध्या नाहीत.शेतकऱ्यांच्या शेतीवरच वार्षिक पिककर्जाची देवाणघेवाण करणे या बाबीला ही बॅंक महत्त्व देत असल्याने शेतकऱ्यांसाठी हि बँक आधार आहे एवढे मात्र खरे!

*****

 शंकरपूर येथील वारजूकर घराण्याचे राजकीय वैशिष्ट्य…

         चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर हे गाव राजकीय दृष्ट्या माजी आमदार तथा माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉ.अविनाश वारजूकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर यांच्या राजकीय कारकीर्दी अंतर्गत महाराष्ट्र राज्यात व देशात पोहोचले आहे.

         डॉ.अविनाश वारजूकर आणि डॉ.सतीश वारजूकर हे दोघेही भाऊ पडतीच्या काळात सुध्दा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि याच पक्षांतर्गत लोकहितासाठी सदैव कार्य करीत आहेत.यामुळेच त्यांचे पक्षनिष्ठतेचे व लोकहितांचे स्वावलंबी व स्वाभिमानी तत्व जैसे थे आहेत असे दिसून आले आहे..

           डॉ.सतीश वारजूकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक अंतर्गत ३ वेळा पराभव स्वीकारला असताना ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आहेत हेच खरे त्यांच्या कर्तृत्वाचे शौर्य आहे असेच समजले पाहिजे…

        महाराष्ट्र राज्यात ईव्हीएम मशीन द्वारे विधानसभा निवडणूका झाल्या नसत्या तर कदाचित डॉ.सतीश वारजूकर हे आमदार असते असे मतदारांचे म्हणणे आहे.

          वारजूकर बंधू चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतःला झोकून देतील असे राजकीय चित्र आहे…

*****

आमदार किर्तीकुमार भांगडीया…

     आमदार किर्तीकुमार भांगडीया हे भांडवल विचारांचे आहेत.ते चिमूर विधानसभा मतदारसंघात भांडवल विचाराला अनुसरून कार्य करीत आहेत.

          भांडवल कार्यपद्धतीची अधिकची आर्थिक बेरीज हे मतदारांना कधीच कळत नाही..आणि पुढेही कळणार नाही..अशीच निती भांडवलदारांची असते…

         भाजपा पक्ष हा उघड उघड भांडवलदारांच्या हिताला प्राधान्य देत आहे.मोजक्या भांडवलदारांचे हितच भाजपाचे सर्वोतोपरी हित आहे.यालाच ते जनतेचे हित मानतात.

       राज्य घटनेत अंतर्भूत असलेल्या लोक अधिकारातंर्गत,जनतेच्या अधिकारांना या पक्षात जागा नाही हे एक वास्तव आहे…

          तद्वतच राजकीय प्रभावाची स्थानिक जुळवाजुळव म्हणजे लोककल्याण नव्हे हे प्रामुख्याने आजच्याही मतदारांना कळत नाही हे एक कटु सत्य आहे…

******

आमदार विजयभाऊ वडेट्टीवार…

       आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना चिमूर विधानसभा मतदारसंघाने खूप काही दिले याची जाणीव त्यांना आहे.

        ते चिमूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या व स्वपक्षाच्या हितासाठी काय करतात ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येणार आहे..

        मागील ११ वर्षाच्या काळात ते चिमूर विधानसभा मतदारसंघात बरेच बोलून गेले,पण वास्तवात त्यांचे शब्द उतरले नाही याची खंतही मतदारात खदखदत आहे.

 *****

उपाध्यक्ष संजय डोंगरे…

          काँग्रेस पक्ष,आमदार डॉ.अविनाश वारजूकर,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,आमदार किर्तीकुमार भांगडीया व त्यांचा भाजप पक्ष असा सानिध्य प्रवास सीडीसीसी बॅंकचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा आहे.

          असा त्यांचा प्रवास लोकहितासाठी उपयुक्त ठरला किंवा नाही ठरला यावर मी भाष्य करीत नाही..

        कारण सहकार क्षेत्रात मोठ्यांचा बडेजाव जास्त असतोय,हे आजपर्यंतचे चित्र आहे.