उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
कोकलापार ता.सावली जि.चंद्रपूर अंतर्गत येतो आहे.मौजा कोकलापार येथील सर्वे क्रमांक २१ मामा तलावात गोसी खुर्द उजव्या कालव्याचे पाणी पाईप लाईन द्वारे सोडण्यात येणार असून या कामांचा भूमिपूजन सोहळा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे अध्यक्षतेखाली व विधिमंडळ नेते तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते आज पार पडले.
तसेच भुमिपुजना नंतर ग्रामपंचायत पटांगण निमगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले,सदर सभेत खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी स्वागत स्विकारून मार्गदर्शन केले.
यावेळी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद संदीप पाटिल गड्डमवार,माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद दिनेश पाटील चिटणुरवार,जेष्ठ नेते सुरेश पाटील शेरकी,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सावली नितीन गोहने,तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी सावली सौ.उषाताई भोयर,माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.वैशालीताई शेरकी,तालुकाध्यक्ष सरपंच संघटना पुरषोत्तम चुदरी,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तथा उपसरपंच राजू पाटील ठाकरे,सरपंच निमगाव सौ.गीताताई लाकडे,माजी नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,व्याहाड खृद सौ.सुनीताताई उरकुडे,चरनदास चिमुरकर मिथुन बाबनवाडे,कमलेश भाऊ, पदाधिकारी,कार्यकर्ते तथा भुमिपूजन प्रसंगी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.



