Home Political विविध विषयाला अनुसरून चंद्रपूर येथे बहुजन समाज पार्टीची सभा झाली संपन्न!

विविध विषयाला अनुसरून चंद्रपूर येथे बहुजन समाज पार्टीची सभा झाली संपन्न!

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

     बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर पदाधिकारी,विधानसभा व शहर पदाधिकारी,बसपा कार्यकर्ते यांची जिल्हा बैठक PWD गेस्ट हाऊस (शासकीय विश्रामगृह) चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आली होती.

         सदर बैठकीचे अध्यक्ष महेंद्र मकेश्वर होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणुन रत्नाकर साठे,सुभाष पेटकर,धर्मेश निकोसे,राजेश ब्राम्हणे,रामराव नन्नावरे,मिलिंद शेंडे,नंदू खोब्रागडे,अल्का शिंदे,संतोष साखरकर,संजु मेश्राम उपस्थित होते.

           या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी,विधानसभा पदाधिकारी,शहर पदाधिकारी व कार्यकर्तागण आवर्जून उपस्थित होते. 

       सदर बैठकीत खालील विषयातंर्गत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

1) सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढणे…

2) सर्व नगरपरिषद निवडणूक लढणे….

3) जिल्हा दौरा आयोजन करण्यात आला…

4) प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले …

5) निवडणूक स्टार प्रचारक नियुक्त करण्यात आले..‌ 

          सभेचे सुत्रसंचालन अविनाश वानखेडे यांनी केले तर प्रास्ताविक रत्नाकर साठे यांनी केले.याचबरोबर आभार प्रदर्शन किसन केसकर यांनी केले.