शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
मनात जिद्द,चिकाटी आणि परिश्रम घेण्याची क्षमता असली की जीवनात आपण काही करू शकतो हे एका ग्रामीण भागातील तरुणीने करुन दाखविले आहे.
आज मूल ते चंद्रपूर या मुख्य मार्गावर हाॅटस्पाट नावाचे सर्वसोयीने युक्त असलेले पाॅश रेस्टॉरंट ताठ मानाने उभे आहे.या रेस्टॉरंटच्या संचालिका आहेत पौर्णिमा किर्तीवार!
त्यांच्या आडनावातच किर्ती असल्यामुळे अल्पकालावधीत हे रेस्टॉरंट प्रसिद्धीच्या झोतात आले.ग्राहकांचाही प्रतिसाद उत्तम मिळत आहे.सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे,विजया भांगे,साधना धकाते,चंदा कामडी,शिला चिमड्यालवार व अर्चना समर्थ यांच्या शब्दाचा आधार आणि त्यांची हिंमत याच बळावर तिने रेस्टॉरंट या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल केली.
ग्रामीण भागातून शहरी भागाकडे रेस्टॉरंट व्यवसायाच्या माध्यमातून प्रवास करणे ही काही साधी गोष्ट नाही.पण पोर्णिमाने कोणाचा आधार नसताना स्वयं बळावर बँकचे उंबरठे झिजविले व कर्ज मंजूर करुन घेतले.
आज बँक कर्जाची नियमित परतफेड तिच्या कडून होत आहे.मुलाचा,सासुंचा व एका खासगी सस्थेतील सर्व कार्यभार सांभाळून ती आपली जबाबदारी पार पाडीत आहे.तीचे कौतुक करावे तेवढे कमीच!
समाजातील तरुणींना पोर्णिमाचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.



