Home Vidarbha महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चिमूर आगार व्यवस्थापकांना सरपंच,उपसरपंच यांच्यासह साठगाव महिलांचे निवेदन..

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चिमूर आगार व्यवस्थापकांना सरपंच,उपसरपंच यांच्यासह साठगाव महिलांचे निवेदन..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी..

    चिमूर व्हाया साठगाव ते नागपूर बस सेवा २ वाजता सुरू करून जुनी असलेली भिवापूर व्हावा साठगांव बस सेवा पुर्ववत सुरू ठेवण्याबाबत साठगाव येथील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चिमूर आगार प्रमुख यांना निवेदन दिले आहे.

        निवेदनात म्हटले आहे की चिमूर आगाराची बस भिवापूरला व्हाया सांठगाव मार्गे सकाळी १०:०० वाजता येत असुन नागपुर,भडारा व गडचिरोली कडे जाणाऱ्या प्रवाशाना सोईची आहे.

       साठगांव व परीसरातील जनतेला आरोग्य उपचारासाठी,शासकीय कामासाठी,कोर्ट कचेरी,तहसील व पंचायत समिती कामासाठी बस सुविधा नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

      तसेच शालेय विद्यार्थ्यांना दुपारची बस सेवा नसल्यामुळे शैक्षणीक व शासकिय कामाकरीता नागपुरकड़े जाण्यासाठी व तसेच साठगाव व परीसरातील जनतेला,विद्यार्थ्यांना गावाकडे येण्यासाठी बस सेवा नसल्यामुळे दुपारी २:०० वाजता ची बस सेवा चिमूर ते साठगाव व्हाया नागपूर अशी सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

      ग्रामीण भागातील जनतेच्या सोई सुविधासाठी दुपारची बस सेवा सुरू करून नागपुर, भिवापुर महाविद्यालयामध्ये,तसेच शंकरपूर महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व आरोग्याच्या दृष्टीकोनातुन बससेवा सुरू करणे आवश्यक आहे.

     मात्र दुपार वेळेची बस सेवा सुरु नसल्यामुळे शैक्षणिक व शासकिय कामा करीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व साठगांव परिसरातील प्रवाशी जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

       यामुळे सकाळी ९ वाजता चिमुर आगारातून व्हाया साठगांव भिवापूरकडे जाणारी बस सेवा पुर्ववत ठेवुन,चिमूर ते साठगाव व्हाया नागपूर अशी दुपारी २.०० वाजताची बससेवा त्वरीत सुरू करावी अशा पध्दतीची मागणी साठगाव सरपंच,उपसरपंच,आणि जेष्ठ महिलांद्वारे करण्यात आली आहे.

       या आशयाचे पत्र आ.किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया देण्यात आले आहे.