शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर येथील जुने बसस्थानक परिसरातील बोबळे यांच्या दुकाना समोर मागिल चार दिवसांपासून एक अनोळखी इसम बसून आहे याबाबत टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचताच अनोळखी इसमाला विचारपूस करण्यात आली.परंतू सदर इसमांनी स्वतः बाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही.

यामुळे सदर इसमाची माहिती पोलिस स्टेशन चिमूर येथे देण्यात आली व त्याला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सदर अनोळखी इसमाचे पुढील आयुष्य चांगले जावे म्हणून दिव्यवंदना आधार फाऊंडेशनच्या आश्रमात कायमस्वरूपी ठेवण्यासाठी टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले.



