Home Maharashtra चऱ्होली खुर्द सोसायटीच्या चेअरमनपदी प्रताप थोरवे तर व्हा.चेअरमन पदी अतुल पवार यांची...

चऱ्होली खुर्द सोसायटीच्या चेअरमनपदी प्रताप थोरवे तर व्हा.चेअरमन पदी अतुल पवार यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- चऱ्होली खुर्द विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवड प्रक्रियेत प्रताप प्रकाश थोरवे यांची चेअरमन तर अतुल उत्तम पवार यांची व्हाईस चेअरमनपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड खेळीमेळीत आणि एकमताने पार पडली गेली.

       मावळते चेअरमन राहुल बापूसाहेब थोरवे आणि व्हाईस चेअरमन राजकुमार बांगर यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक आणि शांततेत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर थोरवे व पवार यांना सर्व संचालक मंडळाने एकमुखाने पाठिंबा दिला.

       नवीन नेतृत्वाबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या प्रसंगी सोसायटीचे सर्व संचालक, चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच व माजी पदाधिकारी, तसेच गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या आशिर्वादाने सोसायटीच्या विकासासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास नवनिर्वाचित चेअरमन प्रताप थोरवे यांनी दिला.