Home Maharashtra शहरात टाकण्यात आलेला मुरूम ठरत आहे जीवघेणा… — वाहनधारकांना जिव मुठीत...

शहरात टाकण्यात आलेला मुरूम ठरत आहे जीवघेणा… — वाहनधारकांना जिव मुठीत धरून करावा लागतो रस्त्याने प्रवास… — हिंगणी रस्ता सांगळूदकर नगर मधिल मुरूम ठरत आहे जिवघेणा… — संबंधित विभाग व कंत्राटदाराची होत आहे मनमानी…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

गेल्या अनेक वर्षापासून हिंगणी रस्ता डॉ.पंजाबराव देशमुख कॉलनी सांगळूदकर नगर गायत्री नगर अवधूत नगर जागृती कॉलनी बाजार समितीच्या मागील परिसर हा रस्त्याच्या विकासापासून अद्यापही मागास आहे येथील रहिवाशांनी प्रत्येक पावसाळ्याच्या दिवसात पालिकेला तक्रारी निवेदन देत आले आहेत.

       किंबहुना उपोषण सुद्धा करण्यात आले त्याचा कुठलाही असर संबंधित विभागावर पडलेला नाही तर या ज्वलंत बाबीकडे बघण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी हे हरवले असून केवळ मतदानाच्या वेळी मतांची भीक मागण्यासाठी दारोदारी फिरत होते हे सत्य नाकारता येत नाही.

         परंतु संबंधित विभागाणे तर पूर्ण झोपेचे सोंग घेतले आहे अति रहदारीचा रस्ता म्हणून हिंगणी रस्ता हा ओळखला जातो या मार्गावर शाळा महाविद्यालय दवाखाना मार्केट मंगल कार्यालय व शेतकरी यांची मोठी वादळ बघायला मिळते परंतु या रस्त्याची दैनीय अवस्था मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असता या रस्त्याला कुणीच वाली नसल्याने विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिक हे जीव वाचवण्यासाठी नागरिकांच्या घरा समोरून मार्गक्रमण करत असताना दिसत आहे.

       या रस्त्यावर मोठ्या खड्याची निर्मिती झाली असून पावसाच्या दिवसात मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे पालिकेच्या वतीने थातूरमातूर स्वरूपात गड्डे बुजवण्यासाठी मुरूम टाकण्यात आला तो सुद्धा अपघाताला कारणीभूत ठरत आहे शहरात टाकण्यात आलेला मुरूम हा बारीक व नरम नसल्याने या मुरूमामध्ये चक्क मोठे दगड असल्याने मोटरसायकल धारकांना डोळ्यात तेल ओतून प्रवास करावा लागतो पहाटेच्या वेळी विद्यार्थ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होते.

         परंतु मोठे दगड टाकल्यामुळे आणखी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही संबंधित विभागाने या बाबीकडे लक्ष केंद्रित करून तेथील मोठ्या आकाराच्या दगडावर रोलर फिरवणे हिताचे ठरेल असे नागरिकांतून व्यक्त होत आहे तरी संबंधित विभाग व कंत्राटदाराचे या बाबीकडे लक्ष केंद्रित होते का हे पाहणे आता योग्य ठरणार आहे.