Home Maharashtra जिल्हाधिकारी यांचेकडून आरमोरी शहरातील विविध विकास कामांची पाहणी…

जिल्हाधिकारी यांचेकडून आरमोरी शहरातील विविध विकास कामांची पाहणी…

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी – दिनांक 24 एप्रिल रोजी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आरमोरी शहरास भेट दिली असता नगर परिषद आरमोरी येथे सुद्धा विविध विकास कामांचा आढावा घेतला,त्यादरम्यान नगराध्यक्ष रुपेश पुणेकर यांनी जिल्हाधिकारी महोदयांचे पुष्पगुच्च देऊन स्वागत केले. 

          यादरम्यान जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद कार्यालया अंतर्गत शहरामध्ये सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला असून यादरम्यान त्यांनी शहरातील रामसागर तलाव सौंदर्यकरण, तालुका क्रीडा संकुल परिसर विकसित करण्यात संदर्भात जागेची पाहणी केली असून नगर परिषद क्षेत्रात असलेल्या महसूलच्या जागा नगर परिषदेस विविध विकास कामे तसेच नगर परिषद प्रशासकीय इमारती साठी उपलब्ध करणेकरिता आवश्यक सविस्तर प्रस्ताव सादर करणेबाबत निर्देश दिले असून शहरामध्ये सुरु असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम विहीत कालावधी मध्ये पुर्ण करणेबाबत सर्व संबंधित यंत्रनेला निर्देश दिलेत.

        यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, आरोग्य सभापती राहुल तितीरमारे,नियोजन सभापती निखिल बोन्द्रे, बांधकाम सभापती शुभम निंबेकर, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती मीनाक्षीताई गेडाम नगर सेवक पंकज खरवडे, अक्षय हेमके, माणिक भोयर,अक्षय बागडे तसेच इतर सर्व नगर सेवक/नगर सेविका,तसेच प्रशासनाच्या वतीने प्रसेणजित प्रधान उपविभागीय अधिकारी देसाईगंज, श्रीमती उषा चौधरी तहसीलदार आरमोरी, प्रितीश मगरे मुख्याधिकारी नगर परिषद आरमोरी व सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.