शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा वाहानगाव येथील इसम परंपरागत देव पुजेसाठी गेला असता दडी मारुन असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करीत प्राण घेतला असल्याची धक्कादायक घटना घडली.
चिमूर तालुक्यामध्ये वन्य प्राणी व मानव प्राणी यांच्यामधील संघर्ष कमी होत असल्याचे दिसून आले आहे.मौजा वाहनगाव येथील श्री.शंकर दादाजी मसराम वय 35 वर्ष हे आदिवासी असल्याने परंपरागत देवाची पूजा अर्चा करण्यासाठी जंगलालगत गेले होते.ही पूजा करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचे दोन्ही पाय व हात खाऊन फस्त केले.
घटनेची माहिती वन विभागाला होताच वनविभागाचे चिमूर प्रादेशिक अधिकारी किशोर देऊळकर व चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे घटनास्थळी हजर झाले व घटनेचा पंचनामा केला.
यानंतर मृतकाचा मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले.
श्री.मृतक शंकर मसराम हा कुटुंबातील कमविणारा एकटाच प्रमुख व्यक्ती असल्याने व त्याच्या मागे पत्नी,दोन मुली आणि दोन भाऊ,असा मोठा आप्तपरिवार असल्याने वनविभागाने या कुटुंबाला भरीव मदत करावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.
मौजा वाहानगाव घटनेमुळे चिमूर तालुक्यात वाघाची दहशत असल्याचे परत दिसून आले.



