युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल गावंडे हे दर्यापूर शहरातील व तालुक्यातील पत्रकारांसोबत दुजाभाव करित असल्याचा अनुभव हा पत्रकारांना दि. 11 जून रोजी आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी भवनाच्या तक्रार एका शेतकऱ्यांने सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली होती. त्याच संदर्भात सभापती सुनिल गावंडे यांनी त्यांच्या कार्यालयात दि. 11जूनला पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
जिल्हा किंवा तालुका स्तरावर कुठलीही पत्रकार परिषद घेतांना सर्व वृत्तपत्राचे,सर्व वृत्त वाहिन्याचे प्रतिनिधी यांना पत्रकार परिषदेला बोलावावे लागते. मात्र दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल गावंडे यांनी तसे केले नाही केवळ निवडक व जवळच्याच पत्रकारांना पत्रकार परिषदेला बोलावून पत्रकार परिषद घेतली.
कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्या ज्या वेळी पत्रकार परिषद झाली त्या त्या वेळी सभापती व कर्मचारी यांनी असेच केले. तालुक्यात विविध वृत्तपत्राचे पत्रकार असतांना केवळ निवडक व मर्जीतील पत्रकारांना पत्रकार परिषदेला का बोलावले? असा प्रश्न निर्माण झाला असून सभापती सुनिल गावंडे यांच्या पत्रकारांसोबतच्या दुजाभावाची चर्चा दर्यापूर शहर व तालुक्यात होत आहे.



