Home Social नालंदा बुद्ध विहारात वर्षावास प्रारंभ,भंते प्रा.एस अनोमदस्सी यांची उपस्थिती…

नालंदा बुद्ध विहारात वर्षावास प्रारंभ,भंते प्रा.एस अनोमदस्सी यांची उपस्थिती…

युवराज डोंगरे/खल्लार  

         उपसंपादक 

        शिल,समाधी,प्रज्ञा या त्रिसूत्रीमुळेच मानवी जिवनात सुख समाधानाची प्राप्ती होत असल्यामुळे, प्रत्येकाने तथागतांनी दाखविलेला हा मार्ग अंगीकारावा व आपल्या आयुष्याचे भले करावे,” असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाच्या पाली विभागात कार्यरत असलेले प्रा. एस.भंते अनोमदस्सी यांनी केले.

       स्थानिक साईनगर, अमरावती नालंदा बुद्ध विहाराच्या वर्षावास 25 च्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन मंचाचे जेष्ट सदस्य साहेबराव नाईक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धम्ममंचावर उपस्थित होते. तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री रमाई च्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंचाचे अध्यक्ष एकनाथ वासनिक व भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडीच्या सुनिता रामटेके यांनी नालंदा बुद्ध विहाराच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली व नंतर पूज्य भंते प्रा.एस. अनोमदस्सी यांचे मंगलवाणीतून धम्मदेशनेचा कार्यक्रम अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला.

      आषाढ पोर्णिमेच्या या मंगलदिनी, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाच्या वाचनास मातोश्री रमाई महिला मंडळातर्फे रितसर प्रारंभ करण्यात आला. 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंचाचे सचिव सुरेश दांडगे यांनी तर कोषाध्यक्ष अरुण रामटेके यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला नालंदाचे अध्यक्ष एकनाथ वासनिक, उपाध्यक्ष पद्माकर मंडोधरे, रविंद्र गेडाम, रविंद्र चवरे, चंदू रामटेके, विनायक दुधे, शंकर मेश्राम, सूरज मंडे, भगवान इंगळे, सुबोध दांडगे, रोशन खोब्रागडे, संजय रामटेके, सुरेश वाघमारे, नाना गवई, सागर खंडारे, प्रमोद मेश्राम, शैलेश मोहोड, सुनिल तायडे, रवि मेश्राम, छत्रपती पवार, वामनराव रामटेके, डॉ. दीपक भगत, निलेश दांडगे, मनोहर दंदे, चंद्रमणी गणविर, परमानंद वासनिक, अशोक मोरे, भिमराव दंदे यांचेसह मातोश्री रमाई महिला मंडळाच्या सुनंदा भोवते, विजया खंडारे, कुंजलता गेडाम, साधना इंगळे, कोमल मेश्राम, शिला तायडे, वंदना चवरे, महानंदा वासनिक, सुनिता रामटेके, विद्या खंडारे, समता सरदार, अनिता गवई, आशा मेश्राम, सुशिला मेश्राम, इंदिरा दुधे, रमा दवणे, प्रभा मोहोड, मंदा मेश्राम, जयमाला रामटेके, संध्या गणवीर, योगिता सरोदे, सिमा मंडोधरे, प्रतिभा नागदिवे, रेखा टेंभूर्णे, प्रीती गवई, सरला दांडगे, शुभांगी मोहोड, वंदना मोरे, संगीता मंडे, तारा लिंघाटे, सुजाता बडगे, जयश्री जाधव, सरला बडगे, संध्या मोरे, पुष्पा वसुकर, कमला वासनिक यांचेसह नालंदा परिसरातील उपासक उपासिका यांची भरगच्च उपस्थिती होती. नालंदा परिवारातील कार्यकर्त्यांनी गायलेल्या भीम बुद्ध गीतांनी वर्षवास 25 च्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.