Home Social नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (CBSE), जमनापूर, साकोली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात...

नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (CBSE), जमनापूर, साकोली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

      साकोली नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल, जमनापूर येथे गुरुपौर्णिमा मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि संस्कारमय वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध उपक्रम सादर केले.

          कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदना यांनी झाली. नंतर विद्यार्थ्यांनी गुरूंच्या महतीवर भाषणे, गाणी, नृत्य, व कविता सादर करून आपली कला व भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी गुरूंसाठी हस्तनिर्मित कार्ड्स व पुष्पगुच्छ देऊन आपला आदर दर्शविला.

        प्राचार्या सौ.भारती व्यास मॅडम, शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना गुरूंचे स्थान समजावून देत अध्यापनाच्या पवित्र कार्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचा सन्मान करण्याचे व चारित्र्यवान बनण्याचे आवाहन केले.

        कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अखेरीस सर्व गुरूंना विद्यार्थ्यांनी “गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु…” या श्लोकाच्या गजरात वंदन केले.